
VIDEO: मुंबईकर सचिनच्या पिचकारीतून उडाला CSKचा रंग
भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. तो आपल्या चाहत्यांशी उत्सवाच्या प्रसंगी कायम शुभेच्छा देत असतो. सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा (Holi Wishes) देखील दिल्या. मात्र सचिनच्या पिचकारीतून जो रंग उडाला त्याची चर्चा सध्या होत आहे.
हेही वाचा: VIDEO: रोहित शर्मा होळीच्या शुभेच्छा देताना रितिका वैतागली
आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 2022) येत्या 26 मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएलच्या फिव्हरला आता कुठे चांगला रंग चढत आहे. यात दरम्यान होळीचा सण आल्याने सोने पे सुहागा अशी क्रिकेट चाहत्यांची भावना झाली आहे. अनेक स्टार खेळाडूंनी आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने देखील होळीच्या शुभेच्छा देताना आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले. त्याने पाळीव प्राण्यांना रंग लागणार नाही याची काळजी घ्या असे सांगितले.
दरम्यान, मुंबई इंडिन्सचा माजी खेळाडू आणि मेंटॉर सचिन तेंडुलकरने देखील होळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत तो पिचकारीतून कॅमेऱ्यावर पिवळ्या रंगाची उधळण करताना दिसत आहे. पिवळा रंग (CSK Yellow Colour) हा मुंबई इंडियन्सचे कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) ट्रेडमार्क रंग आहे. त्यामुळे आयपीएलच्या तोंडावर मुंबईच्या सचिनने सीएसकेच्या पिवळ्या रंगाची उधळण केली. सचिनने आपल्या व्हिडिओत सुरक्षित होळी खेळण्याचा सल्ला देखील चाहत्यांना दिला.
हेही वाचा: Premier League: फुटबॉल सामन्यादरम्यान गळा गोलपोस्टला बांधून अनोखे आंदोलन
Web Title: Mumbai Indians Mentor Sachin Tendulkar Wishes Happy Holi To Fans With Csk Yellow Colour
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..