IPL 2024: MS धोनीच्या CSK ला मोठा धक्का! 16 कोटींचा खेळाडू हंगामातून बाहेर

IPL 2024: MS धोनीच्या CSK ला मोठा धक्का! 16 कोटींचा खेळाडू हंगामातून बाहेर

Ben Stokes opts out of IPL 2024 : आयपीएल 2024 चा पुढील महिन्यात लिलाव होणार आहे. त्याआधी 26 नोव्हेंबरपर्यंत सर्व 10 संघांना कायम असलेल्या खेळाडूंच्या नावाची यादी सादर करायची आहेत. याआधी एमएस धोनीच्या संघाला आणि गतविजेत्या चेन्नईला मोठा धक्का बसला आहे.

सीएसकेचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने कामाचा ताण आणि फिटनेस सुधारण्यासाठी आयपीएलच्या नवीन हंगामातून स्वतःहून माघार घेतली आहे. आयपीएल 2023 च्या लिलावात इंग्लंडच्या स्टोक्सवर 16.25 कोटी रुपयांची मोठी बोली लावण्यात आली होती. CSK ने इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद विक्रमी 5 वेळा जिंकले आहे.

IPL 2024: MS धोनीच्या CSK ला मोठा धक्का! 16 कोटींचा खेळाडू हंगामातून बाहेर
World Cup 2023 : वर्ल्ड कप हुकला पण... क्रिकेट चाहत्यांनी इतिहास रचला! फायनल मॅचने टीव्ही दर्शकांचे तोडले रेकॉर्ड

चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर बेन स्टोक्स न खेळल्याची घोषणा केली. वर्ल्ड कपनंतर गुडघ्यावर शस्त्रक्रिया करणार असल्याचे स्टोक्सने नुकतेच सांगितले. 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. बेन स्टोक्सने 6 डावात 304 धावा केल्या होत्या. 2 शतके आणि 3 अर्धशतके झळकावली. दुखापतीमुळे तो पहिले 3 सामने खेळू शकला नाही.

32 वर्षीय बेन स्टोक्सच्या एकूण टी-20 कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्याने आतापर्यंत 159 सामने खेळले आहेत. 145 डावात 25 च्या सरासरीने 3023 धावा केल्या. स्ट्राइक रेट 133 आहे. त्याने 2 शतके आणि 10 अर्धशतके केली आहेत. वेगवान गोलंदाज म्हणून 93 बळी घेतले आहेत. 16 धावांत 4 बळी ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

स्टोक्सने 43 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या अंतिम फेरीत त्याने पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट खेळी खेळून संघाला चॅम्पियन बनवले. पुढील टी-20 वर्ल्ड कप जून 2024 मध्ये होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com