Ben Stokes : 2019 अन् 2022 बेन स्टोक्सच ठरला इंग्लंडचा तारणहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ben Stokes

Ben Stokes : 2019 अन् 2022 बेन स्टोक्सच ठरला इंग्लंडचा तारणहार

Ben Stokes : टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पाच विकेट्स राखून पराभव करत दुसऱ्यांदा चॅम्पियन बनला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 137 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 19 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने शानदार अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. तीन वर्षांपूर्वी 14 जुलै 2019 हा दिवस क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला कारण स्टोक्सच्या त्या खेळीने इंग्लंड पहिल्यांदाच चॅम्पियन बनला. 2019 आणि 2022 बेन स्टोक्सच इंग्लंडचा तारणहार ठरला.

हेही वाचा: Shaheen Afridi : शाहीन आफ्रिदी 1 चेंडू टाकून थांबला अन् पाकिस्तान वर्ल्डकप हरला

2019 मध्ये इंग्लंडला एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणाऱ्या बेन स्टोक्सने अंतिम सामन्यात पुन्हा एकदा संघाला विजय मिळवून दिला आहे. तो फलंदाजीला आला तेव्हा इंग्लंडची धावसंख्या 32 धावांत दोन विकेट्स अशी होती. यानंतर त्याने एका टोकाने फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून देऊनच परतला.

हेही वाचा: PAK vs ENG Final : इंग्लंड वनडे पाठोपाठ टी-20 चेही विश्वविजेते; पाकिस्तानचा केला पराभव

विश्वचषक 2019 मध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा आश्चर्यकारक पद्धतीने पराभव करून विजेतेपद पटकावले. त्या संस्मरणीय सामन्यात स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला. त्यावेळी बेन स्टोक्सने 98 चेंडूत नाबाद 84 धावांची खेळी करत सामन्यात पुनरागमन केले. त्याच वेळी, आज या खेळाडूने टी-20 विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीतही चांगली कामगिरी केली. अशा प्रकारे बेन स्टोक्स हा दुसऱ्या विश्वचषकात इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात बेन स्टोक्सने 49 चेंडूत नाबाद 52 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळून पराभव तर टाळलाच, पण विजेतेपदही पटकावले.