Shaheen Afridi : शाहीन आफ्रिदी 1 चेंडू टाकून थांबला अन् पाकिस्तान वर्ल्डकप हरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shaheen Afridi  Injured

Shaheen Afridi : शाहीन आफ्रिदी 1 चेंडू टाकून थांबला अन् पाकिस्तान वर्ल्डकप हरला

Shaheen Afridi Injured : पाकिस्तानने इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर फक्त 137 धावा करूनही पाकिस्तानच्या गोलंदाजांनी इंग्लंडला चांगलेच रडवले. या गोलंदाजीचे नेतृत्व करणाऱ्या शाहीन आफ्रिदीला 14 व्या षटकात ब्रुक्सचा कॅच घेताना दुखापत झाली. ही दुखापतीमुळे पाकिस्तानने सामन्यावरील पकड गमावली. पाकिस्तानने सामना 5 विकेट्सनी गमावला. बेन स्टोक्सने आपला अनुभव पणाला लावत नाबाद 52 धावांची खेळी करत पाकिस्तानचे 138 धावांचे आव्हान 19 व्या षटकात पार केले.

हेही वाचा: ENG vs PAK : 'या' कारणांमुळे इंग्लंड पाकिस्तानची कडवी झुंज मोडून काढू शकला

शादाब खानच्या गोलंदाजीवर हॅरी ब्रुक्सने एक उंच फटका मारला. मात्र शाहीन आफ्रिदीने डाईव्ह मारत ब्रुक्सचा कॅच पकडला आणि आफ्रिदी मैदानावरच झोपला. पहिल्यांदा तो दिलासा मिळाला म्हणून मैदानावर झोपला की काय असे वाटले. मात्र बाबर आझम त्याच्याजवळ गेल्यानंतर ब्रुक्सचा कॅच धरताना त्याच्या गुडघ्याला पुन्हा दुखापत झाल्याचे समजले. तो तेथूनच मैदानाबाहेर गेला.

हेही वाचा: Babar Azam : 'मी नैसर्गिक खेळ खेळायला सांगितलं होत मात्र...' पराभवानंतर बाबरची पहिली प्रतिक्रिया

त्यानंतर सामन्याचे 16 वे षटक टाकण्यासाठी शाहीन परत आला. त्यावेळी वाटले की त्याची दुखापत फारशी गंभीर नाही. मात्र षटकाचा पहिलाच चेंडू टाकला आणि शाहीनला पुढे गोलंदाजी करता येणार नाही याची जाणीव झाली. त्याने षटक अर्धवट सोडून ड्रेसिंग रूम गाठली. त्याचे हे षटक पूर्ण करण्यासाठी कर्णधाराने इफ्तिकार अहमदकडे चेंडू सोपवला. मात्र त्याने या षटकात एक षटकार आणि एक चौकारासह 13 धावा दिल्या. इथेच इंग्लंडने सामन्यावर पुन्हा पकड मिळवली.

बेन स्टोक्स आणि मोईन खानने आक्रमक फटकेबाजी करत सामना जवळ आणला. बेन स्टोक्सने 49 चेंडूत 52 धावांची खेळी करत इंग्लंडचा विजय निश्चित केला. त्याला अलीने 13 चेंडूत 29 धावा करत चांगली साथ दिली.

हेही वाचा: Ben Stokes : 2019 अन् 2022 बेन स्टोक्सच ठरला इंग्लंडचा तारणहार

तत्पूर्वी, इंग्लंडच्या सॅम करनने टी 20 वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. त्याने 4 षटकात फक्त 12 धावा देत पाकिस्तानचे 3 फलंदाज टिपले. याचबरोबर आदिल राशिदने बाबर आझम हा हुकमी एक्का बाद करत मोलाचे योगदान दिले. त्याने 22 धावा देत 2 विकेट घेतल्या. ख्रिस जॉर्डननेही 2 विकेट घेत आपला हातभार लावला. यामुळे पाकिस्तानला 20 षटकात 8 बाद 137 धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक 38 धावा केल्या. तर कर्णधार बाबर आझमने 32 धावा केल्या.