esakal | Corona : स्टोक्स कॅप्टन; पाक विरुद्ध इंग्लंडचा नवा संघ
sakal

बोलून बातमी शोधा

Ben Stokes

Corona : स्टोक्स कॅप्टन; पाक विरुद्ध इंग्लंडचा नवा संघ

sakal_logo
By
सुशांत जाधव

पाकिस्तान विरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेपूर्वी इंग्लंडच्या संघातील 7 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. त्यानंतर आता इंग्लंड बोर्डाने पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी 18 जणांचा नव्या संघाची घोषणा केलीये. या संघाचे नेतृत्व हे बेन स्टोक्सकडे देण्यात आले असून संघात अनेक नव्या खेळाडूंचा समावेश आहे. (Ben Stokes to captain England against Pakistan after seven members test positive for COVID 19)

हेही वाचा: ENGvsPAK : इंग्लंडच्या ताफ्यातील 7 जणांना कोरोना

मर्यादित षटकांच्या सामन्यात इयॉन मॉर्गन हा इंग्लंड संघाचा नियमित कर्णधार आहे. पण दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने नवी टीम तयार केली आहे. बुधवारपासून इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील वनडे सामन्याला सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा कार्डिफच्या मैदानात नियोजित वेळेप्रमाणेच खेळवण्यात येईल. वनडे मालिकेनंतर दोन्ही संघात तीन सामन्यांची टी-20 मालिकाही रंगणार आहे.

हेही वाचा: Euro 2020 1st Semi Final Match prediction इटलीचे पारडे जड!

इंग्लंडचा संघ नुकतीच श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळला होता. ब्रिस्टलमधील वनडे सामन्यानंतर इंग्लडच्या खेळाडूंचे कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. यावेळी 3 खेळाडूंसह 4 स्टाफ सदस्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह सदस्यांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना नाइलाजास्तव क्वारंटाईन होण्याची परिस्थिती ओढावली आहे. बेन स्टोक्स दुखापतीमुळे या मालिकेचा भाग नव्हता. आता पुनरागमनाच्या सामन्यात नव्या संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असेल.

इंग्लंड संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक बेल, डॅनी ब्रिग्स, ब्रायडन कार्स, झॅक क्राउले, बेन डंकेत, लुइस ग्रेगरी, टॉम हेल्म, विल जॅक्स, डॅन लॉरेन्स, शाकीब मेहमूद, डेविड मलान, क्रेग ओव्हरटन, मॅट पार्किसन, डेविड पियाने, फिल सॉल्ट, जॉन सिमसन, जेम्स विन्से.

हेही वाचा: ENGvsPAK : इंग्लंडच्या ताफ्यातील 7 जणांना कोरोना

loading image