esakal | ENGvsPAK : इंग्लंडच्या ताफ्यातील 7 जणांना कोरोना
sakal

बोलून बातमी शोधा

England Cricket Team

ENGvsPAK : इंग्लंडच्या ताफ्यातील 7 जणांना कोरोना

sakal_logo
By
सुशांत जाधव

पाकिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी इंग्लंडच्या ताफ्यात कोरोनाने खळबळ माजवलीये. इंग्लंडच्या तीन क्रिकेटर्ससह सात सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 8 जुलै पासून वनडे मालिका नियोजित आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने संघातील खेळाडू आणि सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताची पुष्टी केलीये. (England Cricket Team 7 Member and Players Tested Positive For Covid 19 Before Pakistan ODI Series) इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील वनडे मालिकेला अवघे दोन दिवस बाकी असताना खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झालीये. इंग्लंड दौऱ्यावर तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ इंग्लंडमध्ये रवाना झालाय.

इंग्लंड संघातील खेळाडू आणि स्टाफ मेंबर्संचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेवरही संकट कोसळण्याची भिती निर्माण झालीये. पाकिस्तान विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर इंग्लंड आणि भारत यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका नियोजित आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

हेही वाचा: Euro 2020 1st Semi Final Match prediction इटलीचे पारडे जड!

ज्या इंग्लिश खेळाडूंचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत त्यांची नावे बोर्डाने जाहीर केलेली नाहीत. जर इयॉन मॉर्गन कोरोना पॉझिटिव्ह असेल तर पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत बेन स्टोक्स संघाचे नेतृत्व करताना पाहायला मिळू शकते. इंग्लंडच्या ताफ्यातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे पाकिस्तान विरुद्ध एक नवा संघ मैदानात उतरल्याचेही पाहायला मिळू शकते.

हेही वाचा: POKमध्ये क्रिकेट लीगचे आयोजन; शाहिद आफ्रिदी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

ईसीबीने दिलेल्या माहितीनुसार कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू आणि स्टाफ सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्या संपर्कात असलेल्या खेळाडूंनाही 10 दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे. बेन स्टोक्स या संघाचा भाग नव्हता. दुखापतीतून सावरून पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेतून तो कमबॅक करण्याचे संकेत आहेत. आता तो संघाचे नेतृत्व करतानाही दिसू शकेल.

loading image