इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर, कर्णधाराची टी २० मधून माघार|Ben Stokes to miss ODI & T20 series against India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ben Stokes
इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर, कर्णधाराची टी २० मधून माघार

इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर, कर्णधाराची टी २० मधून माघार

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या मालिकेनंतर आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. तत्पूर्वी टीम इंडियासाठी मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा नवनियुक्त कसोटी कर्णधार आणि तुफानी अष्टपैलू बेन स्टोक्स मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी उपलब्ध होणार नाही. असे एक मुलाखतीमध्ये स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा: पाकचा उमर गुल झाला अफगाणिस्तानचा बॉलिंग कोच

भारताच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात १ जुलैपासून उर्वरीत पाचव्या कसोटी सामन्याने होणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांच्या टी-२० आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यापूर्वी टीम इंडियाला सुखद धक्का देणारी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Video : IPS दीपक पांडेंचा अनोखा अंदाज, ख्रिस गेलसोबत धरला ठेका...

इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार इयान मॉर्गनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्टोक्सच्या न्यूजला दुजोरा दिला. कसोटी सामन्याव्यतिरिक्त टीम इंडिया इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-20 सिरीजदेखील खेळणार आहे. अशातच मॉर्गनने दिलेल्या माहितीनुसार बेन स्टोक्स सिरीजमधन आऊट झाला आहे.

Web Title: Ben Stokes To Miss Odi T20 Series Against India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top