esakal | WTC : संघात स्थान न मिळालेला भुवी करतोय निवृत्तीचा विचार
sakal

बोलून बातमी शोधा

bhuvneshwar kumar

दुखापतीतून सावरुन धमाकेदार पदार्पण करुनही त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघात स्थान मिळाले नाही.

WTC : संघात स्थान न मिळालेला भुवी करतोय निवृत्तीचा विचार

sakal_logo
By
सुशांत जाधव

Bhuvneshwar Kumar Think Retirement : भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमारने दुखापतीतून सावरुन दमदार पदार्पण केले. इंग्लंड विरुद्ध खेळताना घरच्या मैदानावर त्याने चमकदार कामगिरी केली. इंग्लंड विरुद्धच्या कामगिरीच्या जोरावर मार्चमध्ये त्याला आयसीसी क्रिकेटचा मंथ ऑफ द इयर अ‍ॅवार्डने गौरवण्यातही आले. दुखापतीतून सावरुन धमाकेदार पदार्पण करुनही त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (world test championship) आणि इंग्लंड (England Tour) दौऱ्यासाठीच्या संघात स्थान मिळाले नाही. (bhuvneshwar kumar can be goodbye to test cricket)

प्रसारमाध्यमातील चर्चेनुसार, भुवनेश्वर कुमार कसोटी क्रिकेटला बायबाय करण्याच्या विचारात आहे. मोठ्या फॉर्मेटमध्ये खेळण्यापेक्षा मर्यादीत षटकांच्या सामन्यावर अधिक फोकस करण्याच्या इराद्याने तो असा विचार करत असल्याचे बालले जाते. मागील काही वर्षांपासून दुखापत त्याच्या कारकिर्दीत विलनसारखी डोकावताना दिसते. तो भारतीय कसोटी संघाच्या नियमित सदस्यांच्या यादीतून गायब झालाय. त्याला स्वत:लाही कसोटी खेळण्याची इच्छा नाही. त्यामुळेच तो कसोटी सामन्यातून निवृतीचा विचार करत असल्याच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा: 'धोनी निर्दोष'; 10 वर्षानंतर Ian Bell ला कळली चूक

भुवनेश्वर कुमारने 2013 मध्ये भारतीय संघाकडून पहिला कसोटी सामना खेळला होता. आतापर्यंत 21 कसोटीत त्याच्या नावे 63 विकेट आहेत. भुवीने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी तो फेव्हरेट बॉलर आहे. 117 सामन्यातील 116 डावात भुवीने 138 विकेट्स घेतल्या आहेत. 42 धावा खर्च करुन 5 बळी मिळवण्याचा केलेला पराक्रम ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे.

हेही वाचा: ह्रतिकचा दाखला देत जाफरने घेतली वॉनची शाळा

जलदगती गोलंदाजांची कारकिर्द फार अल्प असते. लाँग टाईमचा विचार करता फलंदाजांप्रमाणे त्यांना तिन्ही फॉर्मेटसाठी फिट राहणे शक्य नसते. त्यामुळे भविष्याचा विचार करुन कसोटी न खेळण्याचा भुवीने निर्णय घेतला तर तो आश्चर्यकारक निश्चितच नसेल. एका बाजूला भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटीची तयारी करत असताना दुसऱ्या बाजूला श्रीलंका दौऱ्याचीही तयारी सुरु आहे. भुवी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघातील प्रमुख अस्त्र असेल. याशिवाय इथून पुढच्या मर्यादीत षटकांच्या सामन्यात विराट कोहलीची त्याला पहिली पसंती निश्चित असेल.

loading image
go to top