esakal | ह्रतिकचा दाखला देत जाफरने घेतली वॉनची शाळा
sakal

बोलून बातमी शोधा

wasim jaffer and michael vaughan

ह्रतिकचा दाखला देत जाफरने घेतली वॉनची शाळा

sakal_logo
By
सुशांत जाधव

सोशल मीडियावरील टिवटिवने वाद निर्माण करुन तोंडावर पडणाऱ्या इंग्लंडच्या माजी क्रिकेटर मायकल वॉनने (Michael Vaughan) विराट कोहलीसंदर्भात (Virat Kohli) केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. भारतीय संघाच्या कर्णधारासंदर्भात न पटणारे वक्तव्य केल्यानंतर वॉनची वासीम जाफरने शाळा घेतलीये. विराट कोहली हा भारतीय असल्यामुळे त्याला महान फलंदाज मानले जाते, असे वक्तव्य वॉनने केले होते. जर केन विल्यमसन भारतीय असता तर त्याच्या कामगिरीची दखल घेतली गेली असती, असा दावाही वॉनने केलाय.

वॉनच्या या वादग्रस्त वक्तव्यावर भारताचा माजी क्रिकेटर वसीम जाफर (Wasim Jaffer) ने प्रतिक्रिया दिलीये. एका वाक्यात त्याने मायकल वॉनला जागा दाखवलीये. एक्स्ट्रा बोट तर ह्रतिक रोशनकडे आहे. पण वॉन बोट दाखवण्याचे काम करतोय, असा टोला जाफरने लगावला आहे. निरर्थक बडबड करणे त्याची सवय झाली असून त्याच्या बोलण्यात काहीच अर्थ नसतो, असेच जाफरला म्हणायचे आहे. उगाचच दुसऱ्याकडे बोट दाखवण्याची त्याला वाईट सवय लागलीये, असाच याचा अर्थ होतो.

हेही वाचा: 'धोनी निर्दोष'; 10 वर्षानंतर Ian Bell ला कळली चूक

नेमकं काय म्हणाला होता मायकल वॉन

एका मुलाखतीमध्ये मायकल वॉनने विराट कोहली हा महान खेळाडू आहे, असे मानत नसल्याचे म्हटले होते. जर विराटला महान म्हटले नाही तर सोशल मीडियावर लोक ट्रोल करतात. जर केन विल्यमसन भारताकडून खेळत असतान तर लोकांनी त्याला महान मानले असते. केन विल्यमसनचे कोहलीप्रमाणे 100 M इन्स्टाग्राम फॉलोवर्स नाहीत. तो 30- 40 मिलियन डॉलर कमाई करत नाही, त्यामुळे त्याला महत्त्व नाही. या गोष्टीसमोर कामगिरी फिकी पडते, अशा आशयाचे विधान मायकल वॉनने केले होते.

हेही वाचा: इंग्लंडमध्ये कोच वर्सेस कॅप्टन सामना रंगू नये हिच सदिच्छा!

विल्यमसन जे काही करतो ते बोलून दाखवत नाही. त्यामुळे त्याची चर्चा होत नाही. जर तो भारतीय खेळाडू असता तर लोकांनी त्याला महान मानले असते. विल्यमसन नम्रपणे खेळणारा खेळाडू आहे, असा उल्लेखही वॉन याने केला होता.

मायकल वॉन हा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही वादग्रस्त वक्तव्य करत असतो. त्यावेळी ज्याप्रमाणे त्याला ट्रोल करण्यात येते. विराटसंदर्भातील वक्तव्यामुळेही त्याला ट्रोल करण्यात येत आहे. वसीम जाफरने वॉनच्या बोलण्यात अर्थ नाही, असे सांगत भारतीय कर्णधाराविषयी काहीही बोलल्यास खपवून घेणार नाही, अशीच प्रतिक्रिया दिलीये.

loading image
go to top