Team India : 4 सामन्यात 10 विकेट..., तरीही संघात नाही संधी! 'या' खेळाडूची कारकीर्द संपली का?

bhuvneshwar kumar career
bhuvneshwar kumar careeresakal

Bhuvneshwar Kumar : एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ आपल्या नव्या मिशनसाठी सज्ज होत आहे. ऑस्ट्रेलिया मालिका संपणार आहे, पण सर्वांच्या नजरा फक्त 10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी भारतीय संघाने तिन्ही फॉरमॅटसाठी संघ जाहीर केला आहे. मात्र एका खेळाडूला त्यात स्थान मिळालेले नाही, त्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका होत आहे. तो आहे भुवनेश्वर कुमार. जो बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे, परंतु सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.

33 वर्षीय भुवनेश्वर कुमारने नोव्हेंबर 2022 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता, परंतु सध्या तो विजय हजारे ट्रॉफी खेळत आहे. जिथे तो उत्कृष्ट कामगिरी करत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत 4 सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत, यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 5 पेक्षा कमी आहे. येथे त्याने एका सामन्यात 4 विकेट्स देखील घेतल्या आहेत. म्हणजेच भुवनेश्वर कुमार त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसतो, तरीही दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

माजी वेगवान गोलंदाज आणि गुजरात टायटन्सचे कोच आशिष नेहरा यांनीही भुवनेश्वर कुमारच्या समर्थनार्थ आवाज उठवला होता. आशिष नेहरा म्हणतो की, भुवीची किमान टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी निवड व्हायला हवी होती, कारण तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर तो उपयुक्त ठरू शकतो.

भुवीबद्दल बोलायचे झाले तर, तो गेल्या एक वर्षापासून टीम इंडियामध्ये नाही, आणि काही महिन्याआधी तो जखमीही झाला होता. मात्र टी-20 फॉरमॅटमध्ये नवीन गोलंदाज आल्याने भुवनेश्वर कुमारचा पत्ता कट झाला. याआधी मायदेशात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया मालिकेत भुवीला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही आणि आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही भुवीला स्थान मिळालेले नाही. अशा स्थितीत भुवनेश्वर कुमारला वयाच्या 33व्या वर्षी पुनरागमन करणं कठीण दिसत आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चहर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com