Ind vs Aus : भुवनेश्वर कुमारच्या ट्रोलवर पत्नी नुपूर संतापली, म्हणाली- आधी स्वत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhuvneshwar kumar wife nupur

Ind vs Aus : भुवनेश्वर कुमारच्या ट्रोलवर पत्नी नुपूर संतापली, म्हणाली- आधी स्वत...

Bhuvneshwar Kumar Ind vs Aus : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार सध्या टीकाकार आणि ट्रोलच्या निशाण्यावर आहे. आशिया चषकात पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धचे त्याचे 19 वे षटक भारताला महागात पडले. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. भुवी आणि 19 व्या षटकाचे नाते असे बनले आहे, जे टीम इंडियाला भारी पडत आहे. भुवीच्या ट्रोलला उत्तर देण्यासाठी त्याची पत्नी नुपूरने पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा: IND vs AUS : बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा टी20 सामना खेळणार?, कोण होणार बाहेर

इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ट्रोल्सचे तोंड बंद करताना नुपूरने स्टोरीमध्ये लिहिले की, आजकाल लोक पूर्णपणे नाकारले गेले आहेत. आजकाल लोक इतके नालायक झाले आहेत, की त्यांच्याकडे करण्यासारखे काही चांगले नाही आणि द्वेष आणि मत्सर पसरवायला त्यांच्याकडे इतका वेळ आहे. त्या सर्वांना माझा सल्ला आहे की तुमच्या बोलण्याची किंवा तुमच्या असण्याची कोणालाच पर्वा नाही. म्हणून हा वेळ स्वतःला सुधारण्यासाठी घालवा.

हेही वाचा: Ind Vs Aus: 'अरे फिल्टर वाली दीदी...', भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी अभिनेत्री ट्रोल

ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 सप्टेंबरला खेळल्या गेलेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने 19 व्या षटकात 16 धावा दिल्या. भुवी सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये प्रभावी ठरत होता. पण डेथ ओव्हर्समध्ये तो दडपणाखाली दिसला. भुवी हा भारतातील सर्वात अनुभवी गोलंदाजांपैकी एक आहे आणि या टप्प्यातून कसे बाहेर पडायचे हे त्यालाच माहीत आहे.

हेही वाचा: IND vs AUS: टीम इंडिया पोहोचली नागपुरात, जाणून घ्या कसा आहे रेकॉर्ड

त्यासामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 208 धावा केल्या. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 71 धावा, तर केएल राहुलने 55 आणि सूर्यकुमार यादवने 46 धावा केल्या. 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने 19.2 षटकांत 6 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने 61 आणि मॅथ्यू वेडने नाबाद 45 धावा केल्या.

Web Title: Bhuvneshwar Kumar Wife Nupur Got Angry Trolls Cricket India Vs Australia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..