esakal | 'टीम इंडिया'चं टेन्शन वाढलं; दोन स्टार खेळाडू फिल्डिंगला गैरहजर
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit-Pujara-Injured

भारताचं टेन्शन वाढलं; दोन स्टार खेळाडू फिल्डिंगला गैरहजर

sakal_logo
By
विराज भागवत

Ind vs Eng 4th Test: त्यांच्या जागी सूर्यकुमार, मयंक अग्रवाल मैदानावर

Ind vs Eng 4th Test: भारतीय संघाने दुसऱ्या डावात ४६६ धावांपर्यंत मजल मारली आणि इंग्लंडला ३६८ धावांचे लक्ष्य दिले. सलामीवीर रोहित शर्माचे धडाकेबाज शतक आणि चेतेश्वर पुजारा, शार्दूल ठाकूर व ऋषभ पंतची अर्धशतके यांच्या जोरावर भारताने ही मजल मारली. त्यानंतर भारतीय संघ फिल्डिंगला आला, त्यावेळी दोन स्टार खेळाडू मैदानात गैरहजर होते. रोहित शर्माच्या डाव्या गुडघ्याला छोटीशी दुखापत झाली. तर पुजाराच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली. त्यामुळे BCCIच्या वैद्यकीय टीमच्या सल्ल्याने या दोघांनी फिल्डिंगला न येणं पसंत केलं. त्यांच्या जागी सूर्यकुमार यादव आणि मयंक अग्रवाल मैदानात दिसले. परंतु, ही दुखापत गंभीर नसावी, अशी अपेक्षा सारच भारतीय चाहते करत आहेत.

हेही वाचा: INDvsENG: आदमी एक और पराक्रम ५.. शतकवीर 'हिटमॅन'चा नादच खुळा

दरम्यान, भारताचा पहिला डाव १९१ वर तर इंग्लंडचा पहिला डाव २९० वर आटोपला. इंग्लंडने घेतलेल्या ९९ धावांच्या आघाडीनंतर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात दमदार कामगिरी केली. लोकेश राहुलने ४६ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा जोडीने १५०+ धावांची भागीदारी करत डावाला आकार दिला. रोहितने दमदार शतक (१२७) तर पुजाराने झुंजार अर्धशतक (६१) ठोकले. चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारतीय फलंदाजांनी थोडाशा चुका केल्या.

हेही वाचा: शार्दूल ठाकूरचा डबल धमाका! दुहेरी अर्धशतक ठोकत केला पराक्रम

पहिल्या सत्रात भारताने तीन बड्या खेळाडूंच्या विकेट्स गमावल्या. रविंद्र जाडेजा (९) आणि अजिंक्य रहाणे (०) दोघेही ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर पायचीत झाले. नंतर विराट ९६ चेंडूत ४४ धावा काढून बाद झाला. मग शार्दूल-पंत जोडीने ही आघाडी पुढे वाढवली. ऋषभ पंत (५०) आणि शार्दूल ठाकूर (६०) या दोघांनी अप्रतिम फलंदाजी करत संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराह (२४) आणि उमेश यादव (२५) या दोघांनी भारताला ४६६ धावांपर्यंत मजल मारून दिली.

loading image
go to top