esakal | शार्दूल ठाकूरचा डबल धमाका! दुहेरी अर्धशतक ठोकत केला पराक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

Shardul-Thakur

शार्दूल ठाकूरचा डबल धमाका! दुहेरी अर्धशतक ठोकत केला पराक्रम

sakal_logo
By
विराज भागवत

७ चौकार अन एका षटकारासह शार्दूलने ठोकल्या ६० धावा

Ind vs Eng 4th Test: भारतीय संघाचा (Team India) धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या शतकाच्या (Century) जोरावर भारताने तिसरा दिवस गाजवला. त्यानंतर चौथ्या दिवशी रविंद्र जाडेजा आणि अजिंक्य रहाणे दोघे स्वस्तात बाद झाले. विराट (Virat Kohli) चांगला खेळत असताना ४४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) या दोघांनी दमदार खेळी केली. त्यांनी १०० धावांची भागीदारी केली. विशेष बाब म्हणजे शार्दूल ठाकूरने दुसऱ्या डावातही दमदार अर्धशतक ठोकलं. यासोबतच शार्दूलने एक पराक्रम केला.

हेही वाचा: "मला माहिती होतं..."; दमदार शतकानंतर रोहितची खास प्रतिक्रिया

शार्दूल ठाकूरने ७२ चेंडूंचा सामना करत ६० धावांची दमदार खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि १ षटकार लगावला. शार्दूलने पहिल्या डावातदेखील ३६ चेंडूत ५७ धावांची खेळी साकारली होती. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर त्याने एक पराक्रम केला. आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दोन्ही डावात अर्धशतक करणारा शार्दूल हा कसोटी क्रिकेटमधील केवळ सहावा फलंदाज ठरला. या यादीत हरभजन सिंग आणि वृद्धीमान साहा या दोघांचीही नावे आहेत.

हेही वाचा: जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा; अंजिक्य होतोय ट्रोल

त्याआधी, कसोटीच्या तिसऱ्या दिवसावर वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाने चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात थोडाशा चुका केल्या. पहिल्या सत्रातील पहिला तासभर संयमी पद्धतीने खेळून काढल्यानंतर शेवटच्या काही वेळात भारताने तीन बड्या खेळाडूंच्या विकेट्स गमावल्या. १७१ धावांची आघाडी घेत विराट कोहली आणि रविंद्र जाडेजाने सुरू केलेला चौथ्या दिवसाचा खेळ उपहाराच्या सत्रापर्यंत थोडासा इंग्लंडकडे झुकला. ३ बाद २७० या धावसंख्येवरून सुरू झालेला खेळ उपहाराची विश्रांती झाल्यावर ६ बाद ३२९ धावांवर थांबला. त्यानंतर शार्दूल ठाकूर आणि ऋषभ पंत जोडीने भारताला मोठा आघाडी मिळवून दिली.

loading image
go to top