esakal | विराटच्या 'सिलेक्शनमाग'चं तेजस्वी यादव 'कनेक्शन' तुम्हाला माहितेय का?
sakal

बोलून बातमी शोधा

bihar election result 2020,RJD Leader tejashwi yadav, cricket, ipl

विराटच्या 'सिलेक्शनमाग'चं तेजस्वी यादव 'कनेक्शन' तुम्हाला माहितेय का?

sakal_logo
By
सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला सर्व क्रिकेट प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आपल्या भात्यातील फटकेबाजीनं प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या नाकी नऊ आणणाऱ्या विराटच्या सिलेक्शनची कहाणी ही सध्याच्या घडीला इलेक्शनमुळे चर्चेत असलेल्या राजकीय नेतृत्वाशी कनेक्टेड आहे, असे सांगितल्यावर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हो बिहार निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली विराट कोहली खेळला आहे.

2000 मध्ये बीसीसीआयने देशभरातील नव्या चेहऱ्यांचा शोध घेण्यासाठी एक समिती नेमली होती. भारतीय संघाचे माजी क्रिकेटर आणि निवड समितीचे सदस्य दिलीप वेंगसरकर हे या समतीचे अध्यक्ष होते. या समितीला अंडर 14, अंडर 16 आणि  अंडर 19 मधील नव्या चेहऱ्यांची पारख करण्याची जबाबदारी होती. यावेळी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखील  अंडर 16 च्या संघाकडून प्रतिनिधीत्व करणाऱ्या विराटने मुंबई विरुद्ध दमदार खेळी केली होती. यावरुनच त्याचे सिलेक्शन करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या इमर्जिंग ट्रॉफीसाठी विराटची निवड करण्यात आली होती.  वेंगसरकर यांनी खुद्द एका मुलाखतीमध्ये हा किस्सा शेअर केला होता. 

Womens T20 Challenge 2020 Final : स्मृतीच्या सिक्सरनं करुन दिली दादाच्या खेळीची आठवण!
 
राजकीय मैदानात ज्यापद्धतीने यश मिळाले तसे यश तेजस्वी यादव यांना क्रिकेटमध्ये मिळाले नाही. यंदाच्या हंगामात पहिल्यांदा फायनलमध्ये पोहचलेल्या दिल्लीच्या संघातही त्यांची निवड झाली होती. 2008 ते 2012 या कालावधीत तेजस्वी यादव दिल्ली डेअरडेविल्स (सध्याची दिल्ली कॅपिटल) संघासोबत होते. पण त्यांना एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मध्यफळीतील फलंदाज आणि गोलंदाजीमध्ये चेंडू स्विंग करण्याची क्षमता असलेल्या क्रिकेटला एकाही सामन्यात संधी मिळाली नव्हती. 

राजकीय मैदानात उतरण्यापूर्वी तेजस्वी यादव यांनी क्रिकेटमध्ये हात आजमावण्याचा केलेला प्रयत्न म्हणावा तसा यशस्वी ठरला नाही. 2009 मध्ये त्यांनी झारखंडकडून एक संधी मिळाली. विदर्भ विरुद्ध खेळताना पहिल्या डावात  1  तर दुसऱ्या डावात केवळ 19 धावा करता आल्या. गोलंदाजीमध्येही अपयशच पदरी पडले. 5 षटकात 17 धावा खर्च करुन एकही विकेट मिळाली नव्हती. त्यानंतर तेजस्वी यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये (ए लिस्ट) दोन आणि चार टी-20 सामनेही खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या19, लिस्ट ए मध्ये 9 आणि टी20 मध्ये 3 धावा अशी आहे.