Commonwealth Games 2022 Day 1 : पहिल्याच दिवशी भारताने पाकिस्तानचा केला दोनदा पराभव

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच महिला क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे.
Commonwealth Games 2022 Live
Commonwealth Games 2022 LiveESAKAL

Commonwealth Games 2022 Day 1 Live Updates: कॉमनवेल्थ गेम्स 2022 शुक्रवार 29 जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू झाली आहेत. पहिल्या दिवशी बॉक्सर शिव थापाने बॉक्सिंगच्या 63.5 किलो वजनी गटात पाकिस्तानच्या सुलेमान बलोचचा पराभव केला. त्यानंतर बॅडमिंटनमध्ये भारताने सांघिक प्रकारात पाकिस्तानचा 5 - 0 असा एकतर्फी पराभव केला. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तान भारताकडून दोन वेळा पराभूत झाला.

दुसरीकडे भारतीय महिला हॉकी संघाने घानाचा 5 - 0 असा पराभव करत ग्रुपमधील आपला पहिला सामना जिंकला. मात्र महिला क्रिकेट संघाला विजयी गवसणी घालता आली नाही. रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 3 विकेट्सनी पराभव केला. स्विमिंगमध्ये नटराजने 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात उपांत्य फेरी गाठली. टेबल टेनिसमध्येदेखील मनिका बात्राने दोन जबरदस्त विजय मिळवत धडाक्यात सुरूवात केली.

बॅडमिंटन : पाकिस्तानचा सुपडा साफ 

भारतीय बॅडमिंटन संघाने सांघित प्रकारात पाकिस्तानला 5 - 0 अशी मात दिली. महिला दुहेरीत त्रीसा जॉली आणि गायत्री गोपिचंदने पाकिस्तानच्या माहूर शाहझाद आणि गाझिला सिद्दीकीचा 21-4, 21-5 असा पराभव केला.

बॅडमिंटन : भारत पाकिस्तान सामना 4 - 0

बॅडमिंटन सांघिक प्रकारात भारताने पाकिस्तानचा पुरूष दुहेरीतही पराभव केला. सात्विक रंकरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी मुराद अली आणि मोहम्मद इरफानचा 21 - 12, 21 - 9 अशा गेममध्ये पराभव केला.

हॉकी : भारताने घानाला चिरडले

महिला हॉकीच्या ग्रुप अ मधील आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने घानाचा 5 - 0 असा पराभव केला. भारताकडून

बॅडमिंटन : भारताने पाकिस्तानला लोळवले

भारताचे बॅडमिंटनपटू अश्विनी पोन्नप्पा आणि बी सुमित यांनी मिश्र दुहेरीत पाकिस्तानच्या मोहम्मद भाटी आणि गाझिला सिद्दीकी यांचा 21-9, 21-12 अशा दोन सरळ गेममध्ये पराभव केला. भारताने सांघिक प्रकारात पाकिस्तान विरूद्ध 1-0 अशी आघाडी मिळवली. ही आघाडी पुरूष एकेरीत कदंबी श्रीकांत याने वाढवली. त्याने मुराद अलीचा 21-7, 21-12 अशा गेममध्ये पराभव केला. सिंधूने देखील भारत पाकिस्तान सांघिक प्रकारातील तिसऱ्या सामन्यात महिला एकेरीत माहूर शाहझादचा 21-7, 21-6 असा पराभव करत ही आघाडी 3 - 0 अशी वाढवली.

विशेष म्हणजे भारताने पाकिस्तानचा राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्याच दिवशी दोनदा पराभव केला. बॉक्सर शिव थापाने बॉक्सिंगच्या 63.5 किलो वजनी गटात पाकिस्तानच्या सुलेमान बलोचचा पराभव केला.

स्विमर नटराजन उपांत्य फेरीत दाखल 

भारताचा स्विमर श्रीहरी नटराज 100 मीटर बॅकस्ट्रोक पुरूष प्रकारात उपांत्य फेरी गाठली आहे. तो 54.68 सेकंद इतकी वेळ नोंदवत हीट 4 मध्ये तिसरे स्थान पटकावले. तो एकूण पाचव्या स्थानावर राहिला.

बॉक्सिंग : शिव थापाने धडाक्यात केली सुरूवात

बॉक्सिंगच्या 63.5 किलो वजनी गटात भारताच्या शिव थापाने पाकिस्तानच्या सुलेमान बलोचचा पराभव केला. राऊंड 32 मध्ये झालेल्या या सामन्यात भारताच्या शिव थापाने सामन्यावर पहिल्यापासूनच पकड मिळवली. त्याने सामना 5 - 0 अशा फरकाने एकतर्फी जिंकत पाकिस्तानच्या बॉक्सरला डोके वर काढण्याची संधी देखील दिली नाही.

बॉक्सर शिव थापा सज्ज

भारताचा बॉक्सर शिव थापा 63.5 किलो वजनी गटात राऊंड 32 साठी सज्ज झाला आहे. त्याचा सामना 5 वाजता सुरू होणार आहे.

सायकलिंग महिला संघ

सायकलिंग महिला संघ स्प्रिंट प्रकाराच्या पात्रता फेरीत भारतीय संघाने 51.433 सेकंद इतकी वेळ नोंदवली.

जिमनॅस्टिक : भारतीय पुरूष संघ पात्रता फेरी खेळणार

भारतीय जिमनॅस्टिक्स पुरूष संघ आपले अभियान सुरू करत आहे. यागेश्वर सिंग, सैफ तांबोळी सत्यजीत मुंडाल पात्रता फेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार.

सायकलिंग : भारत पदकाच्या शर्यतीतून बाहेर

पुरूष 4000 मीटर टीम परस्युट पात्रता फेरी, भारतीय संघ 4 मिनिट 12.865 सेकंद वेळ नोंदवत 6 व्या स्थानावर, पदकाच्या शर्यतीतून बाहेर

श्रीहरी नटराज पहिल्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी सज्ज

भारताचा स्विमर श्रीहरी नटराज 100 मीटर बॅकस्ट्रोक पुरूष प्रकारात आपले पहिले अभियान आज 4.29 मिनिटांनी सुरू करणार आहे.

Ind Vs Aus नाणेफेक जिंकत भारताचा फलंदाजीचा निर्णय

भारताचा संघ

हरमनप्रीत कौर, स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ति शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड़, मेघना सिंह, रेणुका ठाकुर

लॉन बॉल्समध्ये तानियाचा पराभव

लॉन बॉल्समध्ये भारताच्या तानिया चौधरीला पराभव स्विकारावा लागला आहे. डी हॉगनविरुद्ध १०-२१ असा पराभव तानियाला स्विकारावा लागला.

टेबल टेनिस: मनिका बत्राचा एकतर्फी विजय

भारताने साऊथ अफ्रिकाविरुद्ध 2-0 अशी आघाडी घेतली आहे, मनिकाने एकतर्फी विजय मिळवला.

महिला टेबल टेनिस

दुहेरीच्या गट सामन्यात श्रीजा अकुला आणि रीत यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला गेम 11-7 असा जिंकला आहे.

टेबल टेनिसला सुरुवात

टेबल टेनिसमधील 2018 चा सुवर्णपदक विजेता महिला संघ त्यांचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत आहे. या संघात दिया चितळे, मनिका बत्रा, रीट टेनिसन आणि श्रीजा अकुला यांचा समावेश आहे.

Lawn Bowls भारताच्या मोहिमेला सुरुवात झाली

  • पुरुषांच्या जोडी - सुनील बहादुर, मृदुल बोरगोहेन

  • पुरुष तिहेरी - दिनेश कुमार, नवनीत सिंग, चंदन सिंग

  • महिला एकेरी - नयनमोनी सैकिया

  • महिला दल – रूपा तिर्की, तानिया चौधरी, लवली चौधरी, पिंकी/न्यानमोनी सैकिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com