
नेटमध्ये बॉलिंग करणाऱ्या पोराला थेट राष्ट्रीय संघात नेलं आणि तो बनला स्विंगचा सुलतान
क्रिकेटच्या जगात स्विंगचा बादशहा म्हटलं की सर्वांच्या नजेरसमोर वसीम अक्रम येतो. पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रम आपला ५५ वाढदिवस साजरा करत आहे. देशांतर्गत स्पर्धेत न खेळता एकदम आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या निवडक खेळाडूंमध्ये वसीमचा समावेश होतो. विशेष म्हणजे त्याच्या करिअरमध्ये त्याच्या पत्नीची भूमिका महत्त्वाची ठरली.
हेही वाचा: गब्बर पुन्हा प्रेमात! VIDEO शेअर करत म्हणाला, 'मोहब्बत में बादशाह भी गुलाम...
संघात समावेशाची अक्रमची रंजक कहाणी
लाहोरच्या सुप्रसिद्ध गद्दाफी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या निवडचाचणीसाठी वसीमही गेला होता. पहिल्या दोन दिवसांत त्याला गोलंदाजी करायची फारशी संधी मिळालीच नाही.तिसऱ्या दिवशी वसीमची गोलंदाजी नेटमध्ये खेळणाऱ्या जावेद मियाँदादने पाहिली आणि त्याने लगेचच वसीमला पाकिस्तानच्या संघात घ्यावे अशी शिफारस केली.
१९८४ दरम्यान वसीम अक्रमने न्यूझीलंड विरुद्ध २५ जानेवारीला टेस्ट सिरीजमध्ये पदार्पण केलं. आणि याच संघाविरुद्ध त्याने २३ नोव्हेंबराल पाकिस्तान वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
१९८५ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध ड्यडिनमध्ये खेळवण्यात आलेल्या मॅचमध्ये त्याने वयाच्या १९ व्या वर्षी १० विकेट घेतल्या. कीवी दौऱ्यावर असताना १९९४ मध्ये त्याने १७९ धावा देत ११ विकेट घेतल्या.
हेही वाचा: फिल्डिंग करताना डोक्याला गंभीर जखम, मैदानातच कोसळला इंग्लंडचा खेळाडू
वसीम अक्रमची कारकीर्द
वसीम अक्रमने 104 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत 414 विकेट घेतल्या. अक्रमने कसोटी क्रिकेटमध्ये 25 वेळा 5 किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आणि 5 वेळा 10 विकेट्स आपल्या नावावर केल्या. याशिवाय त्याने पाकिस्तानकडून फलंदाजी करताना 2898 धावा केल्या. त्याच्या नावावर एक द्विशतक आणि ७ अर्धशतकांसह ३ शतके आहेत.
वसीम अक्रमने 1996 च्या शेखपुरा कसोटीत नाबाद 257 धावा केल्या होत्या. आपल्या शानदार खेळाच्या जोरावर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १७ वेळा सामनावीराचा किताब पटकावला. त्याने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रत्येकी दोनदा हॅट्ट्रिक केली आहे. वसीम अक्रमला देखील मधुमेह होता, परंतु तो त्याच्याबद्दल किंवा त्याच्याशी खेळण्याचा उत्साह तोडू शकला नाही.
Web Title: Birthaday Special Wasim
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..