esakal | भारताला ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल मिळवून देणारा 'हा' पठ्या आहे शुद्ध शाकाहारी
sakal

बोलून बातमी शोधा

Birthday Special sushil kumar is Pure Vegetarian

२०१२ मधील लंडन ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक मिळवत देशाचे नाव उंचावण्याची कामगिरी सुशील कुमारने केली होती. या प्रतिभावान खेळाडूचा काल (ता.२६) जन्मदिवस. 

भारताला ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल मिळवून देणारा 'हा' पठ्या आहे शुद्ध शाकाहारी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतात खेळ क्षेत्रात आपले योगदान देणारे असे अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. ज्यांनी आपली कारकीर्द गाजवत देशातच नाहीतर संपूर्ण विश्वभरात आपली छाप निर्माण केली. क्रिकेटच्या मैदानापासून आपली ओळख निर्माण केलेल्या कपिल देव ते आत्ताच्या भारतीय क्रिकेट संघातील महेंद्र सिंग धोनी प्रमाणे या खेळाडूने देखील, आपल्या खेळात कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा इतिहास जिवंत ठेवला आणि तो खेळाडू म्हणजे सुशील कुमार. २०१२ मधील लंडन ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक मिळवत देशाचे नाव उंचावण्याची कामगिरी सुशील कुमारने केली होती. या प्रतिभावान खेळाडूचा काल (ता. २६) जन्मदिवस.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सुशील कुमारचे पूर्ण नाव सुशील कुमार सोळंकी असे आहे. आपल्या वयाच्या चौदाव्या वर्षापासून कुस्ती खेळण्याची सुरवात करणाऱ्या सुशील कुमारचा जन्म दिल्लीतील नजफगढ येथील बाप्रोला या गावी २६ मे १९८३ रोजी झाला. सुशील कुमार यांचे वडील दिल्लीत एमटीएनएल मध्ये चालक म्हणून कार्यरत होते. आपले वडील आणि भाऊ संदीप यांची कुस्ती खेळण्याची कला पाहूनच सुशील कुमारला देखील कुस्ती खेळण्याची आवड निर्माण झाली. आणि यानंतरच छत्रसाल स्टेडियम मध्ये कुस्तीचे धडे गिरविण्यास सुरवात केली. घरातील हलाखीच्या परिस्थीतीला तोंड देत सुशील कुमारने खेळातील आपली घोडदौड सुरूच ठेवली. महत्वाचे म्हणजे सुशील कुमार हा पूर्णपणे शाकाहारी आहे. सलग दोन ऑलिम्पिक मध्ये कुस्ती खेळात वैयक्तिक पातळीवर पदक जिंकणारा सुशील कुमार हा पहिला भारतीय आहे.
 

२००८ च्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये कास्य पदक आणि २०१२ मधील लंडन ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक मिळवण्याची किमया त्याने साधली. यापूर्वी कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिक मध्ये कांस्यपदक मिळविले होते. त्यानंतर ऑलिम्पिक मधील कुस्तीतील पहिलेच पदक  २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये सुशील कुमारने भारतास मिळवून दिले. याव्यतिरिक्त २०१० साली रशियातील मॉस्को मध्ये संपन्न झालेल्या विश्व कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ६६ किलो फ्रीस्टाईल गटात सुशील कुमारने सुवर्णपदक मिळवत इतिहास रचला होता. तर दिल्लीतील २०१० आणि ग्लासगो येथे २०१४ मध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सुवर्णपदक मिळविले होते. 
-----
पिंपरीतील अटकेत असलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार
-------
भारत-चीन तणाव वाढला! मोदींनी घेतली तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांची भेट
-------
दरम्यान, सुशील कुमारला २००६ मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला असून, २००९ मध्ये खेळातील सर्वोच्च राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.  तर २०११ मध्ये भारत सरकारने पदमश्री देऊन सुशील कुमारला गौरविण्यात आले.