Chess Tournament : प्रज्ञानंद-फिरॉझामध्ये कडवी लढत ; आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा

आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेला गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरुवात झाली. मात्र दोन्ही विभागांतील (पुरुष व महिला) मिळून पहिल्या फेरीतील सात लढती ड्रॉ राहिल्या. पुरुष विभागातील चार, तर महिला विभागातील तीन लढती ड्रॉ राहिल्या.
Chess Tournament
Chess Tournamentsakal

टोरोंटो : आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेला गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरुवात झाली. मात्र दोन्ही विभागांतील (पुरुष व महिला) मिळून पहिल्या फेरीतील सात लढती ड्रॉ राहिल्या. पुरुष विभागातील चार, तर महिला विभागातील तीन लढती ड्रॉ राहिल्या. महिला विभागात चीनच्या झोनग्यी टॅन हिने चीनच्या टिंगजी लेई हिला पराभूत करताना महत्त्वाचा गुण मिळवला. भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने फ्रान्सच्या फिरॉझा एलिरेझा याला रोखले. विदित गुजराती-डी. गुकेश या दोन भारतीयांमधील लढतही ड्रॉ झाली.

आर. प्रज्ञानंद-फिरॉझा एलिरेझा यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. प्रज्ञानंद हा बहुतांशी वेळा आक्रमक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतो. कदाचित तो लढत ड्रॉ व्हावी या उद्देशाने खेळत नसावा.

Chess Tournament
IPL 2024 Suryakumar Yadav : सूर्यकुमार आला रे... पराभवाच्या खाईत हेलखावे खात असलेल्या मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा दिलासा!

मात्र त्यामुळे चाली रचताना जोखीमही पत्करतो. एलिरेझा याने २९ व्या चालीत प्यादाचा त्याग केला. प्रज्ञानंदने याप्रसंगी त्याचा प्यादा मारला. त्यानंतर एलिरेझाकडून घोड्याचाही त्याग करण्यात आला. प्रज्ञानंदने तो मारला नाही. याआधीपर्यंत एलिरेझाचे या लढतीवर वर्चस्व होते, पण त्यानंतर दोन्ही खेळाडू समान पातळीवर आले. प्रज्ञानंदने त्याचा हत्तीही मारला, पण दोघांपैकी कुणालाही या लढतीत विजय मिळवता आला नाही. ३९ व्या चालीनंतर ही लढत ड्रॉ राहिली.

४१ चालींनंतर ड्रॉ

भारतीय खेळाडू सहभागी असलेल्या दोन लढती ड्रॉ राहिल्या. पुरुष विभागात विदित गुजराती-डी. गुकेश यांच्यामधील लढतीसह महिला विभागातील आर. वैशाली-के. हम्पी यांच्यामधील लढतही ड्रॉ राहिली. वैशाली-हम्पी यांच्यामधील लढत ४१ चालींनंतर ड्रॉ राहिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com