esakal | ब्रो तू टेस्ट खेळ IPL नको, बॉलिवूड स्टारचा पंतवर निशाणा

बोलून बातमी शोधा

Rishabh Pant
ब्रो तू टेस्ट खेळ IPL नको, बॉलिवूड स्टारचा पंतवर निशाणा
sakal_logo
By
टीम ई सकाळ

IPL 2021 DC vs RCB : एबी डिव्हिलियर्सची (AB de Villiers) स्फोटक फलंदाजी आणि अखेरच्या षटकात मोहम्मद सिराजने अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने एका धावेन विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला पराभूत करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पाइंट टेबलमध्ये टॉपवर कब्जा केला. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार पंत आणि हेटमायर यांनी शेवटपर्यंत झुंज दिली. पंत आणि हेटमायरच्या झुंजार खेळीचे एका बाजूला कौतुक होत असताना बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक कमाल आर खान याने पंतची शाळा घेण्याचा प्रयत्न केलाय. दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाला रिषभ पंत जबाबदार असल्याचे त्याने म्हटले आहे.

हेही वाचा: IPL 2021 : महिला चॅलेंज गेम फिस्कटणार

कमाल आर खान (Kamaal R Khan) याने रिषभ पंत (Rishabh Pant) वर निशाणा साधणारे एक ट्विट केले आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिलंय की, पंत ब्रो तू चांगली टेस्ट मॅच खेळलास. पण तू आयपीएलमध्ये का खेळतोयस. तुला केवळ टेस्ट मॅचच खेळायला हव्यात. दुसरीकडे त्याने त्याचा जोडीदार हेटमायर याच्या तुफान फटकेबाजीचे कौतुक केले.

हेही वाचा: IPL Record: 360 डिग्री एबी ठरला 'फास्टर फॉरेनर'

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात एबी डिव्हिलियर्सने 42 चेंडूत 75 धावांची धमाकेदार खेळी केली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने दिल्लीसमोर 172 धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. पंत आणि हेटमायर जोडीने डाव सावरला. पण त्यांना संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. अखेरच्या षटकात 14 धावांची आवश्यकता असताना पंतने पाच चेंडू खेळले. त्याने 48 चेंडूत नाबाद 58 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला शिमरॉन हेटमायरने 25 चेंडूत नाबाद 53 धावांची खेळी केली.