esakal | IPL 2021 : महिला चॅलेंज गेम फिस्कटणार

बोलून बातमी शोधा

womens t20 challenge

IPL 2021 : महिला चॅलेंज गेम फिस्कटणार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

Womens T20 Challenge : देशातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये आयपीएल स्पर्धा सुरु असली यंदाच्या वर्षी महिलांना प्रोत्साहन देण्याच्या प्रॉग्रामवर पाणी फिरण्याचे संकेत आहेत. कोरोनाच्या संकटात क्रिकेटच्या मैदानात पुरुषांचा मिजास कायम असला तरी महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेली 'वुमन्स टी 20 चॅलेंज स्पर्धा' होणार नाही, असे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. बीसीसीआय या स्पर्धेसाठी शिबिराचे आयोजन करण्याची बीसीसीआयने तयारी केली होती. मात्र कोरोना संकटामुळे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज महिला क्रिकेटर्संना शिबिरासाठी येणे शक्य नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांनी भारतातील प्रवासावर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे वुमन्स टी-20 चॅलेंजमधील तीन संघात खेळण्यासाठी इतर देशातील महिला खेळाडू उपस्थितीत राहू शकत नाहीत.

हेही वाचा: IPL 2021 : परदेशी खेळाडू आमची जबाबदारी; BCCI चे भावनिक पत्र

बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय महिला खेळाडूंच्या क्वारंटाईनचा कोणताही प्रश्न नाही. परंतु सध्याच्या परिस्थितीत परदेशी महिला खेळाडू भारतात येण्यास तयार नाहीत. परिस्थिती सुधारल्यानंतर या स्पर्धेच्या आयोजनाचा प्रयत्न निश्चितच होईल. मागील वर्षी युएईत रंगलेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान महिला टी-20 चॅलेंजचा थरार पाहायला मिळाला होता.

हेही वाचा: IPL Record: 360 डिग्री एबी ठरला 'फास्टर फॉरेनर'

युएईमध्ये रंगलेल्या वुमन्स टी-20 चॅलेंज स्पर्धेत एकाही ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरने भाग घेतला नव्हता. ऑस्ट्रेलियन महिला बिग बॅश लिगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्या या स्पर्धेसाठी उपलब्ध राहू शकल्या नव्हत्या. यंदाच्या आयपीएल स्पर्धेदरम्यान वुमन्स टी-20 चॅलेंजमधील सामने दिल्लीतील मैदानात नियोजित होते. पण सध्याच्या घडीला दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती भितीदायक आहे.