सहकाऱ्यामुळे बोल्टच्या कारकिर्दीला काळा डाग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

बीजिंग ऑलिंपिकचे रिले सुवर्ण गमावले
ल्युसाने - ट्रॅकचा बादशाह समजल्या जाणाऱ्या जमैकाच्या उसेन बोल्टच्या कारकिर्दीला सहकारी नेस्टा कार्टर याच्यामुळे काळा डाग लागला. उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे बीजिंग ऑलिंपिक स्पर्धेत जमैका संघाने रिलेमध्ये पटकावलेले सुवर्णपदक काढून घेण्यात आले.

या निर्णयाने उसेन बोल्टला कारकिर्दीमधील एक सुवर्ण गमवावे लागले. बीजिंग ऑलिंपिक स्पर्धेत घेण्यात आलेल्या चाचणीच्या फेरअहवालातही कार्टर दोषी आढळला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने जमैका संघाचे सुवर्णपदक काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर ऍथलेटिक्‍स महासंघाला रिले शर्यतीचा सुधारित निकाल देण्यास सांगितले आहे.
कार्टरच्या बरोबरीने याच स्पर्धेत तिहेरी उडी आणि लांब उडीत रौप्यपदक पटकावणारी रशियाची तातियाना लेबेडोवा हीदेखील उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने तिचेही रौप्यपदकही काढून घेण्यात आले.

Web Title: bolt career in smut by partner