Eric Simons : दुबेसमोर फिरकी गोलंदाज घाबरतात - सिमन्स

कमालीचा फॉर्मात असलेला आणि मॅच एकहाती जिंकून देण्याची क्षमता असलेल्या शिवम दुबेला गोलंदाजी करण्यास फिरकी गोलंदाज कचरतात, असे मत चेन्नई संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सिमन्स यांनी व्यक्त केले.
Eric Simons
Eric SimonsSakal

मुंबई : कमालीचा फॉर्मात असलेला आणि मॅच एकहाती जिंकून देण्याची क्षमता असलेल्या शिवम दुबेला गोलंदाजी करण्यास फिरकी गोलंदाज कचरतात, असे मत चेन्नई संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सिमन्स यांनी व्यक्त केले.

वानखेडे या आपल्या घरच्या मैदानावर रविवारी झालेल्या मुळच्या मुंबईच्या शिवम दुबेने ३८ चेंडूंत नाबाद ६६ धावांची खेळी केली. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने सात गोलंदाजांचा वापर केला; परंतु आठ षटकांनंतर फिरकी गोलंजाची वापरली नाही. श्रेयस गोपाल या लेगस्पिनरने केवळ एकच चेंडू दुबेला टाकला.

दुबे फलंदाजीस येतो तेव्हा प्रतिस्पर्धी संघ फिरकी गोलंदाजी बंद करतात आणि वेगवान गोलंदाजांना आक्रमणावर लावतात. हे आता उघड सत्य आहे. तरीही दुबे तेवढीच आक्रमक फलंदाजी करतो, असे सिमन्स यांचे म्हणणे आहे.

केवळ उंच आणि दूरवर फटके मारण्याचीच क्षमता दुबेकडे नसून तो डावावर नियंत्रणही मिळवतो. वेगवान गोलंदाजांविरुद्धही फटकेबाजी करायला त्याला आवडते. अचूक टायमिंग ही दुबेची खासियत आहे. त्याच्या बॅट फ्लोमध्ये कमालीची नजाकता आहे. त्यामुळे दुबेची फलंदाजी पहाणे आनंददायी असते, असे कौतुक सिमन्स यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com