Asian Games 2023 : उपांत्य फेरीतील प्रवेशासह निखतला ऑलिंपिक कोटा

निखत ही दोन वेळची जागतिक विजेती आणि आशिया क्रीडा स्पर्धा तसेच राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेती
Nikhat Zareen
Nikhat Zareen

हांग् चौऊ : बॉक्सर निखत झरीनने आशियाई क्रीडा स्पर्धेत आज उपांत्य फेरी गाठली. त्याचसोबत पॅरिस ऑलिंपिकसाठीचा कोटाही मिळवला. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत ती मुकली होती. निखत ही दोन वेळची जागतिक विजेती आणि आशिया क्रीडा स्पर्धा तसेच राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेती आहे.

Nikhat Zareen
Asian Games 2023 : भारताची सातव्या दिवशी रौप्याने सुरूवात; शुटिंगमध्ये मिळाले अजून एक पदक

हांग् चौऊ येथील या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असताना त्यातून ऑलिंपिक कोटा मिळवणे हे निखतचे मुख्य उद्दिष्ट होते. आजच्या लढतीत तिने जॉर्डनच्या नास हन्मननर जोरदार प्रहार केला. अखेर रेफ्रींनी लढत थांबवत निखतला विजयी जाहीर केले. उपांत्य फेरी गाठण्याबरोबर ऑलिंपिक कोटाही मिळवला याचा आनंद मला अधिक आहे. आता या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणे हे माझ्ये ध्येय आहे, असे निखत म्हणाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com