Asian Boxing : ‘एशियन बॉक्सिंग’मध्ये चमकली सृष्टी साठे; उझबेकिस्तानला नमवित पटकावले रौप्य

कजाकिस्तान येथे झालेल्या आशियायी युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील स्टार बॉक्सर सृष्टी साठे हिने चमकदार कामगिरी केली.
boxer Shrushti Sathe won silver asian boxing championship
boxer Shrushti Sathe won silver asian boxing championshipSakal

छत्रपती संभाजीनगर : कजाकिस्तान येथे झालेल्या आशियायी युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील स्टार बॉक्सर सृष्टी साठे हिने चमकदार कामगिरी केली. तिने अंतिम फेरीत ६३ किलो वजनी गटात उझबेकिस्तानच्या बॉक्सरशी झुंज देत रौप्य पदक जिंकले.

कजाकिस्तान येथे २७ एप्रिल ते ६ मे रोजी दरम्यान आशियायी युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत सुरवातीपासून भारतीय खेळ प्राधिकरण (साई) येथील आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू सृष्टी साठे हिने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरी फेरी गाठली.

या स्पर्धेत तिने अनेक देशातील खेळाडूंना धूळ चाखत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. यात ६३ किलो वजन गटात झालेल्या अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या बॉक्सरशी झुंज देत रौप्य पदक पटकाविले.

यापूर्वी तिने रोहतक हरियाणा येथे झालेल्या ६३ वजन किलो गटात अखिल भारतीय चाचणी पहिला क्रमांक मिळवत या स्पर्धेसाठी पात्र ठरली. सृष्टी साठे हिने आतापर्यंत आपल्या कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय ६६ पदके पटकाविले आहेत.

यात एएसबीसी महिला ज्युनिअर बॉक्सिंग चॅम्पियनशिप (२०२३-कझाकिस्तान) सुवर्णपदक तर आयबीए महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप (२०२३-आर्मेनिया) रौप्यपदक पटकाविले आहे. तिच्या या सुवर्ण कामगिरीमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिला साई येथील कोच सन्नी घयलावत यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com