
भारतीय बॉक्सिंग संघटनेची निवडणूक येत्या २८ मार्चला होणार आहे. त्याआधी उमेदवारांनी नामांकन अर्ज भरले. अध्यक्षपदासाठी चौरंगी लढत रंगणार आहे. विद्यमान अध्यक्ष अजय सिंह यांच्यासमोर हेमंत कलिता, राजेश भंडारी व डी. चंद्रलाल यांचे आव्हान असणार आहे.
अजय सिंह हे स्पाईसजेट एअरलाईन्सचे चेअरमनदेखील आहेत. त्यांनी उत्तराखंड राज्य संघटनेद्वारे अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरला आहे. आसाम बॉक्सिंग संघटनेकडून हेमंत कलिता यांनी, हिमाचल प्रदेश बॉक्सिंग संघटनेकडून राजेश भंडारी यांनी आणि केरळ बॉक्सिंग संघटनेकडून डी. चंद्रलाल यांनी अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरला आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १६ मार्च होती.