रँकिंगमध्ये अव्वल असणाऱ्या ब्राझीलला स्वित्झर्लंडने झुंजवले; अखेर कॅसेमिरो आला धावून | Brazil vs Switzerland | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Brazil vs Switzerland : रँकिंगमध्ये अव्वल असणाऱ्या ब्राझीलला स्वित्झर्लंडने झुंजवले; अखेर कॅसेमिरो आला धावून

Brazil vs Switzerland : रँकिंगमध्ये अव्वल असणाऱ्या ब्राझीलला स्वित्झर्लंडने झुंजवले; अखेर कॅसेमिरो आला धावून

Brazil Beat Switzerland Reached In Knockout : फिफा वर्ल्डकपमध्ये आज संभाव्या विजेत्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या ब्राझीलने स्वित्झर्लंडचा 1 - 0 असा पराभव करत आपले नॉक आऊट राऊंड 16 मधील स्थान पक्के केले. मात्र आजच्या सामन्यात ब्राझीलला स्वित्झर्लंडविरूद्ध पहिला गोल करण्यासाठी खूप झुंजावे लागले. अखेर 83 व्या मिनिटाला कॅसेमिरोने मैदानी गोल करत ब्राझीलचे खाते उघडले. स्वित्झरलंडने झुंजार खेळ करत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या ब्राझीलला जवळपास 82 मिनिटे झुंजवले. ब्राझीलने सर्बिया आणि स्वित्झर्लंडला मात देत दोन सामन्यात 6 गुण मिळवत ग्रुप G मध्ये अव्वल स्थान पटकावले. विशेष म्हणजे ब्राझीलच्या वर्ल्डकपमधील गेल्या 10 सामन्यातील 9 सामन्यात गोल दुसऱ्या हाफमध्येच झाला आहे.

हेही वाचा: Lionel Messi : मेस्सीने मेक्सिकोच्या टीशर्टने फरशी पुसली? VIDEO होतोय व्हायरल

फिफा वर्ल्डकपमधील ग्रुप G मध्ये आज जागतिक रँकिंगमध्ये अव्वल स्थाणावर असणाऱ्या ब्राझील आणि स्वित्झर्लंड यांच्यात लढत झाली. या लढतीत पहिल्या हाफमध्ये ब्राझीलने बॉलवर स्वतःचे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. याचबरोबर त्यांनी शॉर्ट पासिंगिच्या आधारे पहिल्यापासूनच स्वित्झर्लंडच्या गोलपोस्टवर चढाया करण्यास सुरूवात केली. मात्र स्वित्झर्लंडने उत्तम बचाव करत ब्राझीलची आक्रमणे परतवून लावली. पहिल्या हाफ संपेपर्यंत ब्राझीलने स्वित्झर्लंडच्या गोलपोस्टवर 5 चढाया केल्या. मात्र त्यातील 2 शॉट्सच ऑन टार्गेट होते. मात्र स्वित्झर्लंडने उत्तम बचाव करत ब्राझीलच्या खेळाडूंना आपली गोलपोस्ट भेदण्याची संधी दिली नाही. ब्राझीलच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला मात्र त्यांना सफाईदारपणे आपले शॉट्स गोलपोस्टमध्ये डागता आले नाहीत.

हेही वाचा: Morocco Goalkeeper : मोरक्कोचा गोलकिपर गायब होण्याचं काय आहे गूढ?

दुसऱ्या हाफमध्ये ब्राझीलने स्वित्झर्लंडच्या गोलपोस्टवरील आक्रमणाची धार अजून वाढवली. ब्राझीलच्या पहिल्या फळीने सातत्याने स्वित्झर्लंडच्या डीमध्ये हालचाली वाढवल्या. दरम्यान, 66 व्या मिनिटाला वनिकियसने स्वित्झर्लंडची गोलपोस्ट भेदण्यात यश मिळवले. ब्राझीलच्या खेळाडूंनी सामन्यातील आपल्या पहिल्या गोलचे सेलिब्रेशन देखील सुरू केले. मात्र रेफ्रींनी VAR च्या आधारे ऑफसाईड असल्याचा निर्णय देत वनिकियस गोल अवैध ठरवला. यानंतर ब्राझीलला सान्यातील पहिला गोल करण्यासाठी 82 मिनिटापर्यंत वाट पहावी लागली. अखेर कॅसेमिरोने 83 व्या मिनिटाला रॉड्रिगोच्या पासवर मैदानी गोल करत ब्राझीलचे खाते उघडले.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?