Morocco Goalkeeper : मोरक्कोचा गोलकिपर गायब होण्याचं काय आहे गूढ?

Morocco Goalkeeper Disappear
Morocco Goalkeeper Disappear esakal

Morocco Goalkeeper Disappear : मोरोक्कोने तुलनेने बलाढ्य समजल्या जाणाऱ्या बेल्जिमचा रविवारच्या सामन्यात 2 - 0 असा पराभव करत यंदाच्या वर्ल्डकपमधील अजून एक उलटफेर केला. मात्र या सामन्यात राष्ट्रगीतानंतर एक अजब प्रकार घडला होता. मोरोक्कोचा नियमित गोलकिपर यासिने बोनोऊ अचानक गायब झाला होता. देशाच्या राष्ट्रगीतावेळी तो उपस्थित होता. मात्र त्यानंतर तो प्रशिक्षक रेग्रागुईंशी काहीतरी बोलला. त्यांनी त्याला मिठी मारली आणि आपला मोर्चा बदली गोलकिपरकडे वळवला.

Morocco Goalkeeper Disappear
FIFA World Cup 2022 : सर्बिया ठरला 1966 नंतर 'अशी' कामगिरी करणारा पहिला संघ; मात्र झुंजार कॅमेरूनने दिलं बरोबरीचं दुःख

सामन्यादरम्यान, मोरोक्कोचा बदली गोलकिपर काजौरी मैदानात धावला. तो सामन्यापूर्वी होणाऱ्या सांघिक फोटोत उभा राहिला. या बदली गोलकिपरने दुसऱ्या रँकिंगवर असलेल्या बेल्जियमला सामन्यात एकदाही मोरोक्कोची गोलपोस्ट भेदण्याची संधी दिली नाही. दरम्यान, मोरोक्कोच्या संघातील अधिकाऱ्यांनी आणि सामना अधिकारी यांनी देखील गोलकिपर बोनोऊ सामन्यावेळी का अनुपस्थित राहिला याबाबत त्वरित कोणतीच माहिती दिली नाही.

दरम्यान, मोरोक्कोच्या टीव्ही चॅनल 2 एमने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून गोलकिपर बोनोऊला सामन्यापूर्वीच चक्कर येत होती. त्यामुळे त्याने सामन्यात बदली गोलकिपर खेळवण्याबाबत प्रशिक्षकांशी चर्चा केली. दरम्यान, मोरोक्कोच्या अब्देलहामीद साबिरीने 73 व्या मिनिटाला आपल्या संघाला फ्रि कीकवर पहिला गोल करून दिला. त्यानंतर मोरोक्कोसाठी दुसरा गोल हा जकारिया अबोधलालने हाकीम जियेचच्या पासवर स्टॉपेज टाईममध्ये केला.

Morocco Goalkeeper Disappear
Ruturaj Gaikwad VIDEO : ऋतुराजच्या विश्वविक्रमी 'षटकातील 7 षटकार' पाहा एका क्लिकवर

ब्राझीलनंतर फुटबॉल जगतात बेल्जियम दुसऱ्या रँकिंगवर आहे. बेल्जियमने यापूर्वीच्या वर्ल्डकपमधील आपले गेले सात ग्रुप सामने जिंकले होते. तर मोरोक्कोचा 1998 नंतरचा हा वर्ल्डकपमधील पहिला विजय आहे. तर वर्ल्डकपमधील त्यांचा हा एकूण तिसरा विजय होता. जर बेल्जियमने मोरोक्कोला मात दिली असती तर फ्रान्ससोबत नॉक आऊट फेरी गाठणारी ती दुसरी टीम ठरली असती. आता बेल्जियमसमोर ग्रुप स्टेजमध्ये 2018 ची फायनलिस्ट क्रोएशियाचे आव्हान असणार आहे. तर मोरोक्को कॅनडाशी भिडणार आहे.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com