Brazil vs Norway : ब्राझील वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर! Erling Haaland चे दोन भन्नाट गोल अन् नॉर्वेकडून १९९८ सालची पुनरावृत्ती...

Brazil vs Norway FIFA World Cup 2026 Marathi result:फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये एक मोठा धक्का बसला असून पाच वेळचा विजेता ब्राझील संघ स्पर्धेबाहेर पडला आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेने ब्राझीलचा २-१ असा पराभव करत १९९८ मधील ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती केली.
Brazil are out of FIFA World Cup 2026 after a shocking 2-0 defeat to Norway

Brazil are out of FIFA World Cup 2026 after a shocking 2-0 defeat to Norway

esakal

Updated on

Fifa World Cup 2026 Brazil vs Norway Marathi Football News: पाचवेळच्या विजेत्या ब्राझील संघाला फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. नॉर्वे संघाने उप उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ब्राझीलचा २-१ असा पराभव केला. एर्लिंग हालंड ( Erling Haaland ) या सामन्याचा नायक ठरला. भरपाईवेळेत नेयमारने पेनल्टीवर ब्राझीलसाठी एक गोल केला. पहिल्या हाफमध्ये ब्राझीलकडून पेनल्टीवर गोल करण्याची संधी गमावली गेली. गोलरक्षक ओर्जन नायलंडने अविश्वसनीय बचाव करून ब्राझीलला आघाडी घेऊ दिली नाही. त्यापूर्वी तिसऱ्या मिनिटाला नॉर्वेचा गोल ऑफ साईडमुळे नाकारला गेला. नॉर्वेने आपल्या इतिहासात प्रथमच फिफा वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com