फुटबॉल सम्राट पेलेंचे पंचाहत्तराव्या वर्षी लग्न

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जुलै 2016

साओ पावलो - फुटबॉल सम्राट पेले यांनी शनिवारी वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न केले. गेल्या सहा वर्षांपासून त्यांची मैत्रीण झालेल्या मार्सिया सिहबेले आओकी हिच्याशी त्यांनी विवाह केला.

साओ पावलो - फुटबॉल सम्राट पेले यांनी शनिवारी वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न केले. गेल्या सहा वर्षांपासून त्यांची मैत्रीण झालेल्या मार्सिया सिहबेले आओकी हिच्याशी त्यांनी विवाह केला.

पेले यांनीच आपल्या लग्नाची बातमी दिली. पेले आणि आओकी यांची सर्वप्रथम १९८० मध्ये भेट झाली होती. मात्र, २०१० पासून ते नियमित संपर्कात होते. आओकी या ४२वर्षीय व्यावसायिक असून, अलीकडे पेले यांना सातत्याने रुग्णालयात दाखल करण्यात येत होते तेव्हापासून हे दोघे अधिक जवळ आले. एडीसन अर्नेट डू नॅससिमेंटो हे मूळ नाव असणाऱ्या ब्राझीलच्या या फुटबॉलपटूला विश्‍वात ‘पेले’ याच नावाने ओळखले जाते. त्यांनी कारकिर्दीत १,३६३ सामने खेळताना १,२८१ गोल केले. १९५७ ते १९७१ या कालावधीत ते ब्राझीलसाठी ९१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. ब्राझीलमधील सॅण्टोस एफसी आणि न्यूयॉर्क कॉसमॉस या क्‍लबकडूनदेखील त्यांनी खेळ केला.

Web Title: Brazil legend Pele set to marry for a third time, to girlfriend of six years Marcia Cibele Aoki