Brazil Qualify For Next Years World Cup 2026: ब्राझीलला फुटबॉलची पंढरी का म्हटलं जातं हे एकदा पुन्हा सिद्ध झालं.. दिग्गज फुटबॉलपटूंचा वारसा लाभलेल्या ब्राझीलने आतापर्यंत पाच फिफा वर्ल्ड कप जिंकले आहेत आणि पुढल्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी ते सज्ज झाले आहेत.
काल त्यांनी पात्रता स्पर्धेत पॅराग्वेवर १-० असा रोमहर्षक विजय मिळवून २०२६ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपची पात्रता निश्चित केली. नवीन प्रशिक्षक कार्लो अँसेलोट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हा त्यांचा पहिलाच विजय ठरला. व्हिनिशियस ज्युनियरने ४४व्या मिनिटाला अप्रतिम गोल करून ब्राझीलचा विजय पक्का केला होता. त्यानंतर उर्वरित वेळेत ब्राझिलने त्यांचा बचाव अभेद्य राखला.