NEYMAR INHERITS $1 BILLION FORTUNE FROM BRAZILIAN BILLIONAIRE
esakal
ब्राझीलच्या एका अब्जाधीशाने आपली १० हजार कोटींपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता फुटबॉलपटू नेयमार ज्युनियरच्या नावे केली.
विशेष म्हणजे हा अब्जाधीश आणि नेयमार कधीही एकमेकांना भेटलेले नाहीत.
१२ जून रोजी पोर्तो अलेग्रे येथे मृत्युपत्र तयार करण्यात आले, दोन साक्षीदार उपस्थित होते.
Why did Brazilian billionaire leave $1 billion fortune to Neymar? ब्राझीलच्या एका अब्जाधीश उद्योगपतीने त्याची संपूर्ण मालमत्ता स्टार फुटबॉलपटू नेयमार ज्युनियरच्या नावे केली आहे. विशेष म्हणजे हे दोघंही कधीही एकमेकांना भेटलेले नाहीत. तरीही, अब्जाधीशाने त्याची संपूर्ण मालमत्ता नेयमारला देण्याचा निर्णय घेतला आहे. ब्राझीलच्या मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार १२ जून रोजी पोर्तो अलेग्रे येथील एका कार्यालयात मृत्युपत्यु तयार करण्यात आले. यावेळी दोन साक्षीदार देखील उपस्थित होते. आता या प्रकरणाला ब्राझीलच्या न्यायालयांकडून मंजुरी मिळणे बाकी आहे.