Football Competition : ब्राझीलच्या पोलिसांची अर्जेंटिनाच्या प्रेक्षकांना अमानुष मारहाण

विश्वकरंडक पात्रता फुटबॉल सामन्याअगोदरची घटना; मेस्सीही हवालदिल
Brazilian police brutally beat argentina audience
Brazilian police brutally beat argentina audiencesakal

रियो दि जानेरिओ - विश्वकरंडकविजेते अर्जेंटिना आणि माजी विजेते ब्राझील यांच्यात झालेल्या विश्वकरंडक पात्रता फुटबॉल सामन्याअगोदर दंगलीसदृश स्थिती निर्माण झाली होती. ब्राझील पोलिसांनी अर्जेंटिनाच्या प्रेक्षकांना बेदम मारहाण केली.

अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या डोळ्यादेखत ही घटना घडत होती. आपल्या प्रेक्षकांना ब्राझील पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप स्वतः मेस्सीने केला आहे. ही घटना मंगळवारी रात्री ब्राझीलच्या मॅराकॅना स्टेडियमवर घडली.

हा सामना खेळाडूंपेक्षा दोन्ही संघातील चाहत्यांसाठी तणावपूर्ण असणार, याची शक्यता अगोदरपासून वर्तवण्यात येत आहे. सामना सुरूही झाला नव्हता; पण त्याअगोदर हाणामारी झाली. सामना सुरू होण्याअगोदर होत असलेल्या राष्ट्रगीताच्या वेळी वादाची ठिणगी पडली. ब्राझील पोलिसांनी अर्जेंटिना प्रेक्षकांवर जोरदार लाठीहल्ला सुरू केला. याला प्रत्युत्तर म्हणून अर्जेंटिना प्रेक्षकांनी खुर्च्या उचलून पोलिसांवर फेकल्या. काही जणांनी, तर हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.

या हाणामारीत अर्जेंटिनाच्या एका प्रेक्षकाचा चेहरा फार मोठ्या प्रमाणात रक्तबंबाळ झाला होता. तो तसाच खाली पडला होता. अखेर त्याला स्ट्रेचरवरून स्टेडियमबाहेर नेण्यात आले. हाणामारीचा हा प्रकार सुरू झाल्यावर मेस्सी आणि त्याच्या सहाकाऱ्यांनी काही वेळानंतर ड्रेसिंग रूमध्ये परतण्याचा निर्णय घेतला.

सर्व परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी आम्ही ड्रेसिंग रूमध्ये परतण्याचा निर्णय घेतला; अन्यथा मोठी दुर्दैवी घटना घडली असती, असे सांगून मेस्सी म्हणाला. काही जण त्यांच्या कुटुंबासह आलेले असल्यामुळे त्यांनाही नेमके काय करायचे, हे सुचत नव्हते. खेळण्यापेक्षा सामना सोडून द्यायचा विचार आम्ही केला होता. कारण शेवटी आमच्या प्रेक्षकांचे जीव महत्त्वाचे होते.

ब्राझीलचा कर्णधार मार्किन्होसनने मेस्सीशी संवाद साधला आणि त्याच्या सहकाऱ्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला. आम्हीसुद्धा स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या महिला आणि मुलांबाबत चिंतेत होतो, असे तो म्हणाला.

ठिणगी पडली होती...

या महिन्याच्या सुरुवातीला रिओ दि जानेरिओ येथेच झालेल्या अर्जेंटिनाच्या बोका ज्युनियर आणि ब्राझीलच्या फ्लमिनेस या क्लबच्या अंतिम सामन्यात दोन्ही देशांचे समर्थक भिडले होते.

अर्जेंटिनाचा विजय

पोलिसांनी अखेर परिस्थिती नियंत्रणात आणली आणि त्यानंतर सुरू झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने ब्राझीलचा १-० पराभव केला.

हे ब्राझील पोलिस आमच्या प्रेक्षकांवर अमानुषपणे हल्ला करत होते. ते दृश्‍य भयानक होते. यातील काही प्रेक्षक तर आपल्या कुटुंबासह स्टेडियमध्ये उपस्थित होते.

- लिओनेल मेस्सी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com