AUS vs WI : एकीकडे विजयाचा जल्लोष तर दुसरीकडे ब्रायन लाराच्या डोळ्यात अश्रू... कांगारूंवर वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक विजय

AUS vs WI : एकीकडे विजयाचा जल्लोष तर दुसरीकडे ब्रायन लाराच्या डोळ्यात अश्रू... कांगारूंवर वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक विजय

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करून इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या गाबामध्ये कांगारूंनी पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.

2021 मध्ये भारताने या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता आणि वेस्ट इंडिजनेही अशीच कामगिरी केली आहे. रोमहर्षक सामन्यात वेस्ट इंडीजने कांगारू संघाचा 8 धावांनी पराभव केला. वेस्ट इंडिजनेही रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या ऐतिहासिक विजयानंतर एकीकडे जल्लोष तर दुसरीकडे ब्रायन लाराच्या डोळ्यात अश्रू होते.

AUS vs WI : एकीकडे विजयाचा जल्लोष तर दुसरीकडे ब्रायन लाराच्या डोळ्यात अश्रू... कांगारूंवर वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक विजय
AUS vs WI : ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला गाबा पुन्हा एकदा पडला; यावेळी विंडीजने लावला सुरूंग

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पिंक बॉल टेस्ट सामन्यात वेस्ट इंडिज संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पहिल्या डावात खराब सुरुवातीनंतर वेस्ट इंडिज संघाने 311 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने 9 विकेट गमावून 289 धावांवर डाव घोषित केला. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ केवळ 193 धावाच करू शकला आणि यजमान संघासमोर 216 धावांचे लक्ष्य ठेवले. दिलेल्या या लक्ष्याचा पाठलाग करताना शामर जोसेफने कांगारू संघाला घाम फुटला. त्याने 7 विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत झाली.

वेस्ट इंडिज संघाने ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकून 27 वर्षे झाली होती. या सामन्यात समालोचन करणारा महान फलंदाज ब्रायन लारा आपल्या संघाच्या विजयावर आनंद व्यक्त करताना भावूक झाला. तो म्हणाला की, ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करण्यात आम्हाला 27 वर्षांचा मोठा कालावधी लागला. हा एक क्षण आहे जेव्हा कमी अनुभवी युवा संघाने जगज्जेत्याला पराभूत केले. हा विजय लोक दीर्घकाळ लक्षात ठेवतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com