Brij Bhushan Sharan Singh : राज ठाकेरच काय बृजभूषण सिंहांमुळे मायावतींना मुख्यमंत्री असूनही घ्यावी लागली होती माघार

Brij Bhushan Sharan Singh Controversy
Brij Bhushan Sharan Singh Controversy esakal

Brij Bhushan Sharan Singh Controversy : दोनवेळा वर्ल्डचॅम्पियनशिप जिंकणारी भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने सध्याचे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचा आरोप केला. बृजभूषण यांच्याविरूद्ध देशातील प्रसिद्ध कुस्तीपटूंनी गेल्या दोन दिवसांपासून जंतरमंतरवर आंदोलन सुरू केलं आहे. त्यांना पदावरून हटवण्याची मागणी हे कुस्तीपटू करत आहेत.

भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंग हे काही पहिल्यांदाच वादाच्या भोवऱ्या सांपडलेले नाहीत. यापूर्वीही अनेकवेळा ते वादात सापडले आहेत. त्यांच्यावर काही गुन्हेही दाखल झाले होते. मध्यंतरी त्यांनी राज ठाकरे यांचा आयोध्या दौरा रोखला होता. त्यानंतर ते महाराष्ट्राला परिचित झाले. मात्र बृजभूषण सिंहांनीयापेक्षाही अनेक कारनामे केले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांना देखील आपला निर्णय मागे घ्यायला लावला होता.

Brij Bhushan Sharan Singh Controversy
Kaviya Maran: काव्या मारन होणार दक्षिण आफ्रिकेची सून? SA20 लीगमधील तो VIDEO व्हायरल

मायावतींना निर्णय मागे घ्यायला लावला

बृजभूषण शरण सिंह हे सहाव्यांदा खासदार झाले आहेत. ते सध्या भाजपमध्ये आहेत मात्र त्यांनी अनेकवेळा पक्ष बदलला आहे. बृजभूषण यांची राजकीय कारकिर्द देखील वादांनी भरलेली आहे. त्यांचा एक 2004 चा किस्सा खूप प्रसिद्ध आहे. त्यावेळच्या मुख्यमंत्री मायावती यांनी गोंडाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी उघड उघड विरोध केला होता. बृजभूषण सिंह हे हजारो लोकांसह रस्त्यावर उतरले. कडवा विरोध पाहून तत्कालीन मुख्यमंत्री मायावतींनी आपला निर्णय मागे घ्यावा लागला.

बाबरी प्रकरणातही गुन्हा दाखल

बृजभूषण हे कट्टर रामभक्त आहेत. ते राम मंदिर आंदोलनातील एक प्रमुख चेहरा आहेत. बाबरी मशिद वादग्रस्त ढाचा विध्वंस प्रकरणी लालकृष्ण आडवाणी, कल्याण सिंह, मुरली मनोहर जोशी यांच्यासह 40 जणांना अटक करण्यात आले होते. त्यात बृजभूषण यांचे देखील नाव होते. त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायायलयाने 2020 मध्ये दोषमुक्त करण्यात आले.

टाडा लागलेले बृजभूषण हे नाव अंडरवर्ल्डशीही जोडले गेले

बृजभूषण सिंह यांचे संबंध अंडरवर्ल्डशीही संबंध असल्याचे आरोप झाले होते. त्यांना या प्रकरणी टाडा देखील लागला होता. दाऊद इब्राहीमचा मेहुणा इब्राहीम कसकरची हत्या करणाऱ्या अरूण गवळी गँगमधील शूटर शैलेश हळदणकर आणि विबीन यांची हत्या करणाऱ्या शार्प शूटर्सना आश्रय दिल्याचाही बृजभूषण यांच्यावर आरोप होता. मात्र सीबीआय तपासात बृजभूषणम यांना क्लीन चीट देण्यात आली.

जीवघेणा हल्ला केल्याचाही होता आरोप

बृजभूषण शरण सिंह यांच्यावर समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विनोद सिंह उर्फ पंडित सिंह यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. 1993 मध्ये गोंडाच्या गवाबगंज पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल झालीहोती. मात्र न्यायालयाने बृजभूषण शरण सिंह यांच्यासहीत सर्व आरोपींना या प्रकरणात दोषमुक्त करण्यात आले. बृजभूषण यांनी हे आरोप म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगितले होते.

Brij Bhushan Sharan Singh Controversy
Brij Bhushan Singh Controversy : बृजभूषण प्रकरणावर चित्रा वाघ गप्प का?

निवडणूक शपथपत्रात बृजभूषण यांच्यावर चार गुन्हे

बृजभूषण यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्यावर 4 गुन्हे नोंद आहेत मात्र यातील एकाही गुन्ह्यात त्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. या चार गुन्ह्यांपैकी एक गुन्हा हा अयोध्येतील बाबरी विवादीत ढाचा पाडण्यासंबंधातील गुन्हा आहे.

दुसरा गुन्हा हा गोंडाच्या नवाबगंजमध्ये खूनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातही त्यांना दोषमुक्त करण्यात आले आहे. तिसरा गुन्हा हा राम जन्मभूमी अयोध्या पोलीस ठाण्यात सरकारी आदेशाचे पालन न करण्याचा आहे. एका सरकारी अधिकाऱ्याला बंदी बनवण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी अजून निर्णय झालेला नाही.

बृजभूषण हे खेळाडूला थप्पड मारल्याप्रकरणीही चर्चेत आले होते. रांचीमधील राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपदरम्यान बृजभूषण सिंह यांनी एका युवा पैलवानाला कानशिलात लगावली होती.

बृजभूषण 6 वेळा खासदार

बृजभूषण सिंग यांनी राम मनोहर लोहिया विश्वविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांना लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. कुस्तीपटू असलेल्या बृजभूषण सिंह यांनी 1991 मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडूण जिंकले. त्यानंतर त्यांनी 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये वेगवेगळ्या लोकसभा मतदार संघातून निवडणूक जिंकली. त्यांनी भाजप आणि समाजवादी पक्षाकडूनही निवडणूक लढवली आहे. ते 2011 मध्ये भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाले. त्यांचा तिसरा कार्यकाळ आता संपतो आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com