Brij Bhushan Sharan Singh : क्रीडा मंत्रालय कुस्तीपटूंच्या असहकारावर नाराज; ब्रिजभूषण प्रकरणानंतर परिस्थिती बिघडली

Brij Bhushan Sharan Singh
Brij Bhushan Sharan Singhsakal

Brij Bhushan Sharan Singh : भारताच्या आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या कुस्तीपटूंनी कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळवणुकीचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. क्रीडा मंत्रालयाने यासाठी समिती देखील स्थापन केली आहे. मात्र आता कुस्तीपटूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेणेच बंद करत एक प्रकारचे असहकार आंदोलनच सुरू केले आहे. यावरून क्रीडा मंत्रालय नाराज असल्याचे बोलले जात आहे.

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोप करणाऱ्या विनेश फोगाट, बजरंग पुनिया, रवी दहिया, दीपक पुनिया, अन्शू मलिक आणि संगिता मोर यांनी UWW Ranking Series या स्पर्धेत सहभागी होण्याचे टाळले. याचे कारण बहुदा WFI प्रमुख ब्रिजभूषण यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशीला विलंब लागत असल्याचे बोलले जात आहे. हे सर्व कुस्तीपटू केंद्र सरकारच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीमअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळवतात.

Brij Bhushan Sharan Singh
Harry Brook : इंग्लंडच्या ब्रूकने तोडला विनोद कांबळीचा 30 वर्ष जुना विक्रम!

याबाबत क्रीडा मंत्रालयातील एक अधिकारी म्हणाला की, 'त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतरही ते का स्पर्धांमध्ये सहभाग घेत नाहीयेत हे माहिती नाही. आपण चौकशी समितीला वेळ देणे गरजेचे आहे. स्पर्धेत भाग न घेणे हा कुस्तीपटूंचा निर्णय आहे. आम्ही त्यांच्यावर सक्ती करू शकत नाही. मात्र त्यांनी स्पर्धा चुकवू नयेत.'

ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपानंतर सहा सदस्यांची समिती कुस्ती संघटना चालवत आहे. या समितीचे नेतृत्व महान बॉक्स मेरी कोम करत आहे. ही समिती ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांची देखील चौकशी करत आहे.

भारताकडून मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पदक जिंकलेल्या महिला कुस्तीपटूंनी ज्यावेळी ब्रिजभूषण यांच्याविरूद्ध जंतरमंतरवर लैंगिक छळाचे आरोप करत ठिय्या आंदोलन सुरू केलं त्यानंतर क्रीडा मंत्रालयाला चौकशी समिती स्थापन करावी लागली.

Brij Bhushan Sharan Singh
ISSF World Cup : अनिश भानवालाने 12 वर्षाचा दुष्काळ संपवला; भारताला जिंकून दिले पदक

क्रीडा मंत्रालयाने 23 जानेवारीला समिती स्थापन केली. त्याचा अहवला चार आठवड्यात देण्यास सांगितला. जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत ब्रिजभूषण यांना बाजूला रहायला सांगण्यात आले. ठरलेल्या वेळेनुसार समितीला 23 फेब्रुवारीला अहवाल येणे अपेक्षित होते. मात्र क्रीडा मंत्रालयाने समितीला दोन आठवड्यांचा अजून वेळ वाढवून दिला.

(Sports Latest News)

हेही वाचा : जाणून घ्या कॉन्ट्रा फंडातल्या गुंतवणुकीबाबत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com