esakal | धक्कादायक! कांस्यपदक विजेत्या नेमबाजाचा बंद घरात आढळला मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

Shooter-Namanveer-Brar

धक्कादायक! कांस्यपदक विजेत्या नेमबाजाचा बंद घरात आढळला मृतदेह

sakal_logo
By
विराज भागवत

पोलिसांनी व्यक्त केला आत्महत्येचा संशय, वाचा सविस्तर

भारताचा राष्ट्रीय स्तराचा नेमबाज नमनवीर सिंग ब्रार (Shooter Namanveer Brar) याचा मृतदेह मोहाली येथील त्याच्या राहत्या घरात सोमवारी सकाळी आढळला.पोलिसांनी प्राथमिक पाहणी केल्यानंतर ही आत्महत्या असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. मोहाली शहरातील सेक्टर ७१ मधील त्याच्या निवासस्थानी त्याचा मृतदेह सापडला. नमनवीर ब्रार यांच्या कुटुंबीयांना या बातमीने धक्का (Shocking) बसला. नमनवीरने असे टोकाचे पाऊल का उचलले असावे हे कळत नसल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. शवविच्छेदन (Post Marten) अहवालातच खरा प्रकार समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: T20 World Cup : मॅथ्यू हेडनसह आफ्रिकेचा दिग्गज पाक संघाला देणार धडे

नमनवीर ब्रार याचा मोठा भाऊ डॉ. प्रभसुखमन ब्रार हादेखील नेमबाज आहे. त्याचे वडील व्यावसायिक आहेत. तर आई हरप्रीत ब्रार ही गृहिणी आहे. पंजाबच्या फरीदकोटवरून २००९मध्ये ब्रार कुटुंब मोहालीला शिफ्ट झाले होते. नमनवीर ब्रार प्रतिभावान नेमबाज होता. त्याने २०१५ ला दक्षिण कोरियाच्या ग्वांझू येथे झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये डबल ट्रॅप प्रकारात कांस्यपदक पटकावले होते. ट्रॅप प्रकारातील सांघिक प्रकारात त्याने अंकूल मित्तल आणि असगर हुसेन यांच्यासमवेत ही कामगिरी केली होती. त्याच वर्षी झालेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी शूटींग चॅम्पियनशीपमध्ये आणि पोलंडला २०१६ला झालेल्या FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी शूटिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत त्याने कांस्यपदक मिळवले होते.

loading image
go to top