सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश | BWF World Championship PV Sindhu | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BWF World Championship PV Sindhu
BWF World Championship : सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश

BWF World Championship : सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने (PV Sindhu) थायलंडच्या पॉर्नपावी चोचुवांगचा (Pornpawee Chochuwong) दोन गेममध्ये पराभव करत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या (BWF World Championship) उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. गतविजेत्या पी. व्ही सिंधू (PV Sindhu) आता आणखी एक जागतिक अजिंक्यपद मिळवण्याच्या जवळ पोहचली आहे.

पी व्ही सिंधूने चोचुवांगचा 21 - 14, 21 - 18 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पहिल्या गेममध्ये सिंधूने सुरुवातीला आघाडी घेत चोचुवांगवर दबाव निर्माण केला होता. मात्र चोचुवांगने 9 - 9 अशी बरोबरी करत गेममध्ये पुनरागमन केले. पण सिंधूने आपला खेळ उंचावत चोचुवांगला आघाडी घेण्याची संधी दिली नाही. अखेर सिंधूने पहिला गेम 21 - 14 असा मोठ्या फरकाने जिंकला. (BWF World Championship)

सिंधूने दुसऱ्या गेमची सुरुवातही धडाकेबाज केली. मात्र लगेचच चोचुवांगने (Pornpawee Chochuwong) 4 -4 अशी बरोबरी करत जोरदार प्रतिकार केला. याही गेममध्ये सिंधूने (PV Sindhu) चोचुवांगला आघाडी घेण्याची संधी दिली नाही. सिंधूला चोचुवांगने दुसऱ्या गेममध्ये शेवटपर्यंत झुंज दिली. अखेर सिंधूने दुसरा गेम 21 - 18 असा तीन पॉईंटच्या फरकाने जिंकत आपला उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला. (BWF World Championship)

Web Title: Bwf World Championship Defending Champion Pv Sindhu Reached Quarter Final

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :sportsBadmintonPV Sindhu