Candidates Chess: भारताचा गुकेश इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर, अखेरची फेरी ठरणार निर्णायक

D Gukesh: भारताचा 17 वर्षीय बुद्धिबळपटू डी गुकेशकडे आता आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धेत इतिहास रचण्याची संधी आहे.
D Gukesh
D GukeshSakal

- रवींद्र मिराशी (बुद्धिबळ अभ्यासक )

D Gukesh: टोरंटो येथे होत असलेली आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा (Candidates Chess Tournament) अंतिम टप्प्यात आहे. या स्पर्धेत संपूर्ण भारताचे लक्ष लागले आहे ते १७ वर्षीय डी गुकेशकडे. तो केवळ 17 वर्षांचा असल्याने त्याच्याकडे या स्पर्धेत विजेतेपद जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे.

गुकेशने या स्पर्धेत सुरुवातीपासूनच शानदार खेळ दाखवला आहे. दरम्यान, १३ व्या फेरीत त्याच्याकडे अधिक लक्ष होते. या फेरीत त्याचा सामना होता फ्रान्सचा आघाडीचा खेळाडू फिरोउझा अलिझेराविरुद्ध. तसेच त्याच्याविरुद्ध गुकेशचे पारडे जड राहिल असे अंदाज अनेकांचे होते.

दरम्यान या फेरीत फिरोउझाविरुद्ध गुकेशने पांढऱ्य़ा मोहऱ्यासह सुरुवात केली. त्याने राजासमोरील प्यादे दोन घरं पुढे सरकवत पहिली चाल खेळली. त्यानंतर तिसऱ्या चालीसाठी त्याने 'रुय लोपेझ' ओपनिंगला प्राधान्य दिले.

त्यावर फिराउझाने त्याला चांगले प्रत्युत्तर दिले. त्याने 'बर्लिन' बचाव केला. पण यावर गुकेशने 'कॅसल' चाल करत आपला राजा सुरक्षित राहिल याची काळजी घेतली. त्याच्याचप्रमाणे फिरोउझानेही ही चाल केली, परंतु त्याने 12 व्या चालीला 'कॅसल' केले.

D Gukesh
Candidates Chess: दहाव्या फेरीनंतरही विजेता ठरेना! गुकेश, नेपोनियात्ची पहिल्या स्थानावर कायम

यानंतर फिरोउझा एच-6 प्याद्याची चाल खेळेल, असे वाटत असतानाच त्याने जी-6 प्याद्याची चाल केली. यादरम्यान, दोन्ही युवा खेळाडूंनी वेगवेगळ्या रणनीती वापरून सामन्यात वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. हळुहळू गुकेशच्या 34 व्या चालीनंतर दोन्ही संघांचे राजे उघडे पडले.

त्यानंतर दोघांनीही 38, 39 आणि 40 व्या चालीला हत्तीचा वापर केला. त्यामुळे हा डाव बरोबरीत संपणार का, अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, गुकेशने नवीन रणनीती पुढे ठेवली. त्याने वजीर एच-4 ही चाल केली.

यानंतर फिरोउझा अश्व आणि हत्ती यांचे आक्रमण निर्माण करेल, असे अंदाज होते. परंतु, त्याने गुकेशचा वजीरासमोर वजीर ठेवला. त्यासाठी त्याने वजीर जी-6 अशी चाल केली. ही चाल गुकेशला तोट्याची नव्हती. हीच चाल सामना गुकेशच्या बाजूने झुकण्यासाठी टर्निंग पाँइंट ठरली.

D Gukesh
Candidates Chess: भारताचा गुकेश विजयाची संधी साधणार? आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा निर्णायक टप्प्यात

गुकेशने 48 व्या चालीला हत्तीच्या मदतीने जी-6 मधील फिरोउझाचे प्यादे बाजूला केले. त्यातच फिरोउझाने अश्व सी-2 ही चाल केल्याने तो आणखी मागे पडला. तरी त्याने 63 व्या चालीपर्यंत गुकेशला कडवी लढत दिली होती. मात्र, अखेर गुकेशने सामना जिंकला.

Gukesh D (2743) defeats 🇫🇷 Alireza Firouzja
Gukesh D (2743) defeats 🇫🇷 Alireza Firouzja

त्यामुळे आता या स्पर्धेत गुकेश साडे आठ गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्यामुळे आता एक अंतिम फेरीत त्याला चांगल्या विजयाची अपेक्षा आहे. त्याचा चौदाव्या फेरीतील सामना जागतिक क्रमवारीतील हिकारू नाकामुराशी आहे. त्यामुळे हा सामना त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे.

सध्या नाकामुरा, रशियाचा इयान नेपोम्नियाची आणि फॅबिआनो कॅरुआना आठ गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला आगामी काळात होणाऱ्या जगज्जेतेपदाच्या लढतीत डिंग लिरेनशी सामना खेळावा लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com