राणीचा 'तो' गोल अन् महिला हॉकी संघाला मिळालं टोकियो ऑलिंपिकचं तिकीट!

Indian-Womens-Hockey-Team
Indian-Womens-Hockey-Team

भुवनेश्‍वर : आदल्या दिवशी ज्या संघाविरुदध कमालीचे वर्चस्व गाजवले त्याच अमेरिका संघाने शनिवारी (ता.2) श्‍वास कंठाशी आणला. अखेर निर्णायक क्षणी कर्णधार राणी रामपालने केलेल्या निर्णायक गोलाच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघ टोकिया ऑलिंपिकसाठी पात्र ठरला.

आजच्या लढतीत भारताचा अमेरिकेकडून पराभव झाला परंतु कालच्या आणि आजच्या सामन्यातील गोलसरासरीत भारताने 6-5 अशी बाजी मारली. 

ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत शुक्रवारी (ता.1) झालेल्या सामन्यात भारताने अमेरिकेचा 5-1 असा सहज पराभव केला होता. आजच्या परतीच्या लढतीत भारताची 1-4 अशी हार झाली. गोलसरासरी 5-5 अशी असताना रानी रामपालने 11 मिनिटे असताना गोल केला. त्यामुळे भारताची सरासरी 6-5 अशी झाली. 

कालच्या सामन्यात सहज विजय मिळवलेला असल्यामुळे भारत ऑलिंपिक प्रवेशाच्या उंबरठ्यावर होता, पण आजचा दिवस वेगळीच कहाणी सांगत होता. ज्या भारतीय खेळाडूंनी काल आक्रणाची माळ ओवली होती, त्या भारतीय संघाच्या बचावाची माळ आज विस्कटली होती. आणि अमेरिकेच्या आक्रमक खेळाडू हल्लाबोल करत होत्या. पहिल्या 28 मिनिटांत चार गोल करून भारतीयांना बॅकफूटवर टाकले होते. भारतीयांसाठी खेळ खल्लास झाल्यासारखीच स्थिती निर्माण झाली होती. 

भारत आणि अमेरिका संघाचे मुख्य प्रशिक्षक अनुक्रमे ओएर्ड मारिजेन आणि जेनेक शोपमन हे दोन्ही नेदरलँड्‌सच्या एकाच क्‍लबमधून हॉकी खेळलेले आहेत. त्यामुळे ते एकमेकांची क्षमता चांगलीच जाणून आहेत. काल भारताकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला असला तरी शोपमन यांनी हार मानली नव्हती. त्यांनी आपल्या खेळाडूंना आक्रमणाचा मंत्र दिला. त्यामुळे पाचव्याच मिनिटाला अमांडा मेगांदनने गोल केला. 

या एका गोलाने तसा फरक पडणारा नव्हता; परंतु 14 आणि 20 व्य मिनिटाला गोल झाले, तेव्हा मात्र भारतीय गोठात चलबिचल सुरु झाली. यातून सावरायचे कसे असा विचार होत असतानाच मध्यांतरला अमेरिकेकडून चौथा गोल झाला. त्यावेळी सरासरी 5-5 अशी होती. 

मध्यांतरानंतर भारतीय संघाने सर्वस्व पणास लावले. प्रथम संयम मिळवला. अमेरिकेची आक्रमणे थोपवली. 49 व्या मिनिटाला राणीने भारताचा एकमेव आणि निर्णायक गोल केला, तेव्हा कलिंगा स्टेडियममध्ये जल्लोष झाला. 

काय घडले?

- शुक्रवारी भारताचा 5-1 विजय 
- शनिवारी भारताचा 1-4 पराभव 
- गोल सरासरी 6-5

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com