Carlos Alcaraz : अखेर 10 वर्षे 9 महिन्यांनी जोकोविच विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर हरला! 20 वर्षाच्या अलकाराझने इतिहास रचला

Carlos Alcaraz Wimbledon
Carlos Alcaraz Wimbledon esakal

Carlos Alcaraz Wimbledon : स्पेनच्या अव्वल मानांकित कार्लोस अलकाराझने अखेर नोव्हाक जोकोविचची सेंटर कोर्टवरील तब्बल 10 वर्षाची दादागिरी संपवली आहे. आपले आठवे विम्बल्डन जिंकून फेडररशी बरोबरी करण्यासाठी कोर्टवर उतरलेल्या 36 वर्षाच्या नोव्हाक जोकोविचला अवघ्या 20 वर्षाच्या कार्लोसने पाच सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात पराभवाची धूळ चारली.

कार्लोसने 1-6, 7-6 (8/6), 6-1, 3-6, 6-4 अशी झुंज देत विजय मिळवला. कार्लोस हा विम्बल्डन जिंकणारा तिसरा सर्वात कमी वयाचा टेनिसपटू आहे. (Wimbledon 2023 News)

Carlos Alcaraz Wimbledon
IND vs PAK Ahmedabad : नुसती नफेखोरी! भारत - पाक सामना आवाक्याबाहेर, विमानांचे तिकीट दर पाहून येईल चक्कर

नोव्हाक जोकोविच आज विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर आपले आठवे विम्बल्डन जिंकण्याच्या इराद्याने उतरला होता. तसंही सेंटर कोर्टवर गेल्या दहा वर्षापासून जोकोविचला कोणी आव्हान देऊ शकलं नव्हतं. सर्बियाच्या या स्टार टेनिसपटूला सेंटर कोर्टवर अँडी मरेने 2013 मध्ये मात दिली होती. (Novak Djokovic News)

आज त्याच्यासमोर 20 वर्षाचा स्पेनचा एक लाढाऊ बाणा असलेला अलकाराझ होता. नोव्हाक जोकोविचने पहिला सेट 6 - 1 असा जिंकत दमदार सुरूवात केली. 36 वर्षाचा मुरलेला जोकोविच कार्लोसची सरळ सेटमध्येच शिकार करणार असे वाटत असतानाच.

Carlos Alcaraz Wimbledon
India Women's Cricket Team : एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाचे स्वप्न पाहणाऱ्या भारताला बसला जोरदार झटका

नदालचा वारसा सांगणाऱ्या कार्लोसने दुसरा सेट 7 - 6 (8-6) असा कडवी झुंज देत जिंकला. कार्लोची झुंज पाहून अवाक झालेल्या जोकोविचला पुढच्या सेटमध्ये प्रतिकाराची संधीही न देता स्पेनच्या टेनिसपटूने तिसरा सेट 6 - 1 असा खिशात टाकला.

यानंतर जोकोविचने आपला सर्व अनुभव पणाला लावत चौथा सेट 6 - 3 असा जिंकत आपले आव्हान कायम ठेवले. मात्र यावेळी जोकोविच आणि काही प्रमाणात कार्लोसने देखील चुका केल्या. मात्र तरूण कार्लोसने पाचव्या सेटमध्ये जोकोविचला 6 - 4 अशी मात देत त्याचे आठ विम्बल्डन जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com