IND vs PAK Ahmedabad : नुसती नफेखोरी! भारत - पाक सामना आवाक्याबाहेर, विमानांचे तिकीट दर पाहून येईल चक्कर

Ahmedabad Flights Ticket
Ahmedabad Flights Ticketesakal

India vs Pakistan Ahmedabad : भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक बीसीसीआयने (BCCI) जाहीर केले. त्यानंतर भारतात होणाऱ्या वर्ल्डकपचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. त्यातच भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ एकमेकांना भिडणार आहेत. हा सामना भारतीयांना याची देही याची डोळा पाहण्याची सुवर्णसंधी यंदा लाभणार आहे. (India Vs Pakistan)

Ahmedabad Flights Ticket
India Women's Cricket Team : एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाचे स्वप्न पाहणाऱ्या भारताला बसला जोरदार झटका

मात्र ही सुवर्णसंधी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची सुवर्ण आभूषणे गहाण ठेवावी लागतील का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यावेळी बीसीसीआयने भारत - पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना हा अहमदाबादमध्ये (Ahmedabad Flights Ticket) खेळवणार असल्याचे जाहीर केले आहे. तेव्हापासून तेथील हॉटेल रूमचे भाडे गगणाला भिडले आहे.

तरी वेडे क्रिकेट चाहते रेल्वे स्टेशनवर रात्र काढू मात्र सामना स्टेडियममध्ये पाहू असे म्हणतील. मात्र आता त्यांना अजून एक मोठा झटका बसला आहे. अहमदाबादला 14 ऑक्टोबरला जाणाऱ्या विमानांची तिकीटे ही देखील 25,000 रूपयापर्यंत पोहचली आहेत. (Ahmedabad Air Ticket)

विशेष म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विमानाची तिकीटे ही 2500 ते 3000 रूपयांपर्यंत मिळत आहेत. मात्र 14 ऑक्टोबरचे हेच तिकीट हे 20 हजाराच्या पुढे गेले आहे. तिकीट दरात जवळपास 900 टक्क्यांची वाढ झाली आहे. (India Vs Pakistan ICC ODI World Cup 2023 Match News)

Ahmedabad Flights Ticket
Anil Kumble R. Ashwin : अश्विनने घेतल्या डझनभर विकेट्स तरी कुंबळे म्हणतो 'या' फिरकीपटूला मिळावी संधी

25 हजाराचं तिकीट

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वीच्या एक दिवस आधीचं अहमदाबादचं विमानाचं तिकीट हे 10 हजार रूपयांपासून सुरू होत आहे. 14 ऑक्टोबरचं सर्वात स्वत तिकीट हे इंडिगो एअरलाईन्सचं आहे. त्याची किंमत 9 हजार 011 रूपये इतकी आहे. तर एअर इंडियाचे तिकीट हे 12 हजार ते 25 हजार रूपयांपर्यंत मिळत आहे. स्पाईस जेटचं तिकीट हे 20 हजार 207 रूपयांना मिळत आहे. (India Vs Pakistan News)

दिल्ली - मुंबईतून येणाऱ्यांसाठी तिकीट महागलं

ईज माय ट्रीप (EaseMyTrip) चे सीईओ आणि सह संस्थापक निशांत पिट्टी यांनी सांगितले की अहमदाबादसाठीच्या विमान तिकीटामध्ये आतापर्यंत सर्वात जास्त वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या ही वाढ सहापट झालेली दिसत आहे. मुंबई आणि दिल्लीतून अहमदाबादसाठीचे विमानाचे तिकीट जास्त महाग झाले आहेत. सामन्यासाठी उत्साहित असलेले चाहते आतापासूनच तिकीट बूक करत आहेत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com