ऑस्ट्रेलियाची हेन्‍रिकेझ, पॅटिन्सनला पसंती

पीटीआय
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

मेलबर्न - या वर्षी होणाऱ्या आयसीसी अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने झटपट क्रिकेटमध्ये यापूर्वी योग्यता सिद्ध केलेल्या अष्टपैलू जेम्स फॉकनरबरोबरच अनुभवी फलंदाज उस्मान ख्वाजा, पीटर हॅंड्‌सकोम्ब, जॉर्ज बेली, कॅमेरून व्हाईट यांच्याऐवजी मोझेस हेन्‍रिकेझ आणि जेम्स पॅटिन्सन यांना पसंती दिली आहे. 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेकदा ऑस्ट्रेलियाचा तारणहार ठरलेल्या जेम्स फॉकनरला वगळण्याचा निर्णय आश्‍चर्यकारक मानला जात आहे. फॉकनरला २०११ पासून प्रथमच संघातून वगळण्यात आले आहे. त्याची जागा मोझेस हेन्‍रिकेझला देण्यात आली आहे. त्याचबरोबर मार्क स्टोईनिस आणि जॉन हॅस्टिंग्ज असे अन्य पर्यायदेखील त्यांनी तयार ठेवले आहेत. उस्मान ख्वाजा आणि पीटर हॅंड्‌सकोम्ब या प्रमुख फलंदाजांनादेखील संघात स्थान मिळालेले नाही.

आयपीएल दरम्यान गंभीर जखमी झालेला ख्रिस लीन आणि भारत दौरा अर्धवट सोडावा लागलेला मिशेल स्टार्क यांनादेखील तंदुरुस्त होण्याच्या विश्‍वासावर संघात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलिया संघ स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी म्हणजे १८ मे पर्यंत दोघे तंदुरुस्त होतील असा विश्‍वास निवड समितीने व्यक्त केला आहे. त्यांच्या जागी जेम्स पॅटिन्सनला पुनरागमनाची संधी देण्यात आली आहे.

संघ : स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, ॲरॉन फिंच, जॉन हॅस्टिंग्ज, जोश हेझलवूड, ट्राव्हीस हेड, मोझेस हेन्‍रिकेझ, ख्रिस लिन, ग्लेन मॅक्‍सवेल, जेम्स पॅटिन्सन, मिशेल स्टार्क, मार्क्‌स स्टोईनिस, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), ॲडम झम्पा.

Web Title: Champion trophy