Russia Ukraine War : UEFA ची 'किक' रशियाच्या पचनी पडेना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

putin

Russia Ukraine War : UEFA ची 'किक' रशियाच्या पचनी पडेना!

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचा आता क्रीडा जगातवरही परिणाम होताना दिसतोय. युक्रेन विरुद्धच्या आक्रमक भुमिकेमुळे रशियाने चॅम्पियन्स लीग फायनलचे यजमानपद गमावले आहे. रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे फुटबॉल चॅम्पियन्स लीग फायनल नियोजित होती. पण युद्धजन्य परिस्थितीमुळे हा सामना पॅरिसमध्ये स्थलांतरित करण्यात आला आहे. यावर आता रशियाकडून प्रतिक्रिया आली आहे. रशियन क्रीडा मंत्रालयाने यावर नाराजी व्यक्त केलीये.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव वाढत असताना चॅम्पियन्स लीग स्पर्धेत सहभागी असलेल्या राष्ट्रांनी रशियात फायनल खेळवणे योग्य नसल्याचे म्हटले होते. वेगवेगळ्या देशांनी फायनलचे ठिकाण बदलण्याती मागणी केली होती. दोन्ही देशातील युद्धाला सुरुवात झाल्यानंतर UEFA ने रशियाला दणका दिला. सेंट पीटर्सबगर्गवरील सामना पॅरिसमध्ये स्थलांतरित करण्यात आला.

हेही वाचा: पुतिन यांना घरचा आहेर; रशियन टेनिसपटूने कॅमेऱ्यावर लिहिले...

रशियाच्या क्रीडा मंत्रालयाकडून यासंदर्भात एक निवेदन काढण्यात आले आहे. UEFA चा हा निर्णय अयोग्य आहे. रशियाने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा नेहमीच सन्मान केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेची भव्यता टिकवून ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. क्रीडा आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टा असून त्यांना वेगळे ठेवायला हवे, असा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे.

हेही वाचा: रशियाला दणका; चॅम्पियन्स लीगची फायनल पॅरिसमध्ये होणार!

युरोपियन फुटबॉल युनियनने रशियातील सेंट पीटर्सबर्गमध्ये नियोजित फायनल लढत फ्रान्सच्या सेंट डेनिस मैदानात खेळवण्यात येईल, अशी माहिती दिली होती. ठरलेल्या तारखेला म्हणजे 28 मे शनिवारीच फायनल सामना खेळवण्यात येईल. रशियासाठी हा एक मोठा धक्काच होता. याच कारण की, 2018 नंतर पहिल्यांदाच त्यांना एखाद्या मोठ्या स्पर्धेचं यजमानपद मिळाले होते. फुटबॉल फायनलशिवाय फॉर्म्युला 1 शर्यतही रद्द करण्यात आली आहे.

Web Title: Champions League 2022 Final Russia Vs Ukraine Saint Petersburg Football Uefa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top