रशियाला दणका; चॅम्पियन्स लीगची फायनल पॅरिसमध्ये होणार!

UEFA shifted Champions League final to Paris
UEFA shifted Champions League final to ParisESAKAL

चॅम्पियन्स लीग (Champions League) फुटबॉल (Football) स्पर्धेचा अंतिम सामना रशियातील सेंट पिटर्सबर्ग (St Petersburg) येथे होणार होता. मात्र आता रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे हा अंतिम सामना पॅरिसला (Paris) होणार आहे. याबाबतची माहिती UEFA ने आज दिली. चॅम्पियन्स लीगची फायनल ही आता फ्रान्समधील 80000 प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियमवर होणार आहे. ही फायनल 28 मे ला होणार आहे. (Russia Ukraine Conflict UEFA shifted Champions League final to Paris from St Petersburg stadium)

UEFA shifted Champions League final to Paris
Mexico Open: झ्वेरेव्हला रॅकेट आपटणं तब्बल 30 लाखाला पडलं

UEFA ने इतक्या कमी वेळात फायनल रशियातून पॅरिसला हलवण्यात आपले सहकार्य दिल्याबद्दल फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांचे आभार मानले आहेत. युरोपियन क्लब फुटबॉल समितीने देखील प्रतिष्ठेचा सामना फ्रान्समध्ये घेण्यात हिरवा कंदील दाखवला. याबाबतचे वक्तव्य UEFA आणि फ्रान्स सरकारने संयुक्तरित्या प्रसिद्ध केले.

UEFA shifted Champions League final to Paris
लिअँडर पेस घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी; रियासोबत होता लिव्ह-इनमध्ये

सेंट पिटर्सबर्ग स्टेडियम हे आधी 2019 च्या चॅम्पियन्स लीग फायनलसाठी निवडण्यात आले होते. मात्र ही स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आली. सेंट पिटर्सबर्ग हे स्टेडियम रशियन सरकारच्या मालकीची एनर्जी फर्म गाझप्रोमच्या नावावर आहे. तसेच गाझप्रोम ही UEFA च्या चॅम्पियन्स लीगच्या प्रमुख प्रायोजकांपैकी एक कंपनी आहे.

UEFA shifted Champions League final to Paris
युक्रेनमध्ये बॉम्बिंग; भारतीय पॅरालिम्पिक मेडलिस्ट चिंतेत

ब्रिटन सरकारने फुटबॉल चॅम्पियन्स लीग स्पर्धेची फायनल रशिया बाहेर खेळवण्याची मागणी केली होती. युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशननं ( Union of European Football Associations/UEFA) रशियात नियोजित फायनल लढतीसंदर्भात पुनर्विचार करावा, असे ब्रिटनने म्हटले होते. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांनी आगामी चॅम्पियन लीग फायनलसंदर्भात चिंता व्यक्त केली होती. रशियाने युक्रेनवर हल्ला करु नये, असे आवाहनही त्यांनी व्लादिमिर पुतिन यांना केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com