बार्सिलोनाला बरोबरीत रोखून टॉटेनहॅम बाद फेरीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

टॉटेनहॅम - लुकास मौरासने अखेरच्या क्षणी केलेल्या गोलाच्या जोरावर टॉटेनहॅमचे चॅंपियन्स लीगमधील भवितव्य कायम राहिले. या गोलामुळे त्यांनी बार्सिलोनाला १-१ असे बरोबरीत रोखले आणि अंतिम १६ संघांतील त्यांचा मार्ग सुकर झाला.

गटामध्ये अव्वल स्थान सर्वाधिक गुण मिळवून कायम बार्सिलोनासाठी या सामन्याच्या निकालाने फरक पडणार नव्हता. त्यामुळे त्यांनी लिओनेल मेस्सीसह काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली. परिणामी जबाबदारी असलेल्या ओस्माने देम्बेलेने सुरवातीलाच गोल करून बार्सिलोनाला वर्चस्व मिळवून दिले; परंतु अंतिम पाच मिनिटांचा खेळ नाट्यमय ठरला.

बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी टॉटेनहॅमकरिता बरोबरी पुरेशी होती. अंतिम क्षणी गोल झाल्यानंतर त्यांच्या खेळाडूंनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. सामना संपल्यानंतर काही सेकंद त्यांच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरचे भाव सर्व काही स्पष्ट करणारे होते.

गटामध्ये अपराजित राहून अव्वल स्थान कायम ठेवणे हे आमचे पहिले ध्येय होते. आमच्यासाठी ही मोठी कामगिरी आहे, असे बार्सिलोनाचे प्रशिक्षक एर्नेस्टो वेलवर्दे यांनी सांगितले. मेस्सीसह प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा त्यांचा निर्णय कॅम्प नोऊ स्टेडियममधील बार्सिलोनाच्या प्रेक्षकांना पटला नव्हता.

आम्ही अगोदरच बाद फेरीसाठी पात्र ठरलो आहोत यातूनच आमची ताकद स्पष्ट होते. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत देम्बेलेने केलेल्या खेळावर आम्ही समाधानी आहोत, असे वेलवर्दे म्हणाले. या २१ वर्षीय खेळाडूच्या बेशिस्तीवरून बार्सिलोना संघात नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर वेलवर्दे यांनी त्याचे केलेले कौतुक महत्त्वाचे ठरत आहे. त्याने केलेला गोल फारच अप्रतिम होता. त्याच्यासारखी क्षमता असलेले खेळाडूच अशाप्रकारे गोल करू शकतात, अशीही पुष्टी वेलवर्दे यांनी जोडली.

Web Title: Champions League Barcelona vs Tottenham