
अहिल्यानगर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचांच्या चुकीच्या निकालामुळे निर्माण झालेला वाद आता सांगलीच्या मातीत संपवण्याचा निर्धार डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी केला आहे.
यंदाचा महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळ आणि वादाच्या केंद्रस्थानी असलेला मल्ल डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे यांच्यात सांगलीच्या आखाड्यात लढत निश्चित करण्यात आली आहे. या लढतीला दोन्ही मल्लांनी हिरवा कंदील दाखवला आहे. महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यातील वाद सांगलीत संपेल, असा विश्वास चंद्रहार यांनी व्यक्त केला आहे.