Maharashtra Kesari: '...तर दोन्ही महाराष्ट्र केसरी गदा परत करणार, शिवराजवरही अन्याय', चंद्रहार पाटील आक्रमक

Chandrahar Patil :६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचांच्या निर्णयावरून मोठा वाद झाला आहे. त्यानंतर आता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत देण्याचा निर्णय जाहीर केलाय.
Chandrahar Patil
Chandrahar PatilSakal
Updated on

Chandrahar Patil to Return Both Maharashtra Kesari Maces: ६७ वी महाराष्ट्र केसरी ही कुस्ती स्पर्धा वादात अडकली आहे. रविवारी (२ फेब्रुवारी) या स्पर्धेचा अंतिम दिवस होता. मात्र रविवारी प्रतिष्ठीत महाराष्ट्र केसरी सामन्यांमध्ये मोठा राडा झाला, त्याचे पडसाद अद्यापही कुस्ती वर्तुळात उमटत आहेत.

रविवारी पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी गदेचा मानकरी ठरला. परंतु, त्याने खेळलेले उपांत्य आणि अंतिम सामने अत्यंत वादग्रस्त ठरले. स्पर्धेत इतका गोंधळ झाला की पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता.

Chandrahar Patil
Maharashtra Kesari: शिवराजने लाथ मारण्याऐवजी पंचाला गोळ्याच घालायला हव्या होत्या; महाराष्ट्र केसरी राड्यावर चंद्रहार पाटील संतापले
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com