Skating Players Struggle for Practice
esakal
जिल्हा क्रीडासंकुलावर असलेल्या स्केटिंग ट्रॅकवर मोठ्या प्रमाणावर खेळाडू स्केटिंगचा सराव करायचे. मात्र, काही वर्षांपूर्वी हा ट्रॅक नवीन बांधकामासाठी तोडण्यात आला. तेव्हापासून जागा मिळेल तिथे शहरातील खेळाडू स्केटिंगचा सराव करतात. ही अडचण प्रशिक्षक, खेळाडूंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांच्याकडे मांडली. त्यांनी माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांना यासंदर्भात निवेदन दिले.