एफए कप फुटबॉलमध्ये चेल्सी अंतिम फेरीत 

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

चेल्सीने एफए कपऐवजी प्रीमियर लीग लढतीस जास्त महत्त्व दिले आहे. प्रीमियर लीगमध्ये दुसऱ्या असलेल्या टॉटनहॅमविरुद्धची लढत असूनही चेल्सीने मंगळवारची साऊदम्प्टनविरुद्धची लढत लक्षात घेत हॅझार्ड आणि दिएगो कोस्टाला सुरवातीस राखीव ठेवले.

लंडन - एडन हॅजार्ड आणि त्याच्याऐवजी सुरवातीस संधी देण्यात आलेला विलियन यांच्या प्रभावी कामगिरीमुळे चेल्सीने टॉटनहॅम हॉट्‌सपूरचा 4-2 असा पराभव केला आणि एफए कप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

चेल्सीने एफए कपऐवजी प्रीमियर लीग लढतीस जास्त महत्त्व दिले आहे. प्रीमियर लीगमध्ये दुसऱ्या असलेल्या टॉटनहॅमविरुद्धची लढत असूनही चेल्सीने मंगळवारची साऊदम्प्टनविरुद्धची लढत लक्षात घेत हॅझार्ड आणि दिएगो कोस्टाला सुरवातीस राखीव ठेवले. हॅझार्डऐवजी संघात आलेल्या विलियन याने चेल्सीचे खाते उघडले; तसेच उत्तरार्धातही आघाडीवर नेले होते.

विलियनने उत्तरार्धात घेतलेली आघाडी टॉटनहॅमच्या डेले अलीच्या गोलने मोडीत निघाली. त्यानंतर मैदानात आलेल्या हॅझार्डने वेगवान खेळ करीत चेल्सीचा विजय निश्‍चित केला. प्रीमियर लीगमध्ये चेल्सी आघाडीवर असले तरी त्यांच्याकडे चारच गुणांची आघाडी आहे. नुकतेच मॅंचेस्टर युनायटेडने त्यांना हरवले आहे. या विजयाने चेल्सीचा आत्मविश्‍वास नक्कीच उंचावला असेल. त्यांना नशिबाची साथ लाभली; पण त्यांचा खेळ विजेत्या संघास साजेसाच होता. विलियन आणि मिशी बॅत्सुआयी या नवोदितांनी सुरुवातीपासून जोरदार आक्रमण रचित आपल्याला कमी समजू नका, असाच इशारा दिला. त्यातून सावरलेल्या टॉटनहॅमने चांगला प्रतिकार केला; पण चेल्सीवर प्रीमियर लीगमध्ये दडपण ठेवण्यासाठी त्यांना क्रिस्टल पॅलेसला पराजित करावे लागेल. 

Web Title: Chelsea edge Spurs in FA Cup final