चेन्नईयीनने पुणे सिटीला नमविले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

चेन्नई - गतविजेत्या चेन्नईयीन एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पाच लढतींनंतर पहिला विजय मिळविला. त्यांनी एफसी पुणे सिटीला दोन गोलांनी नमविले. जेजे लालपेखलुआ याने ४४व्या; तर ५१व्या मिनिटाला डेव्हिड सुसी याने गोल नोंदविला. मागील पाच लढतींत तीन बरोबरी आणि दोन सलग पराभव यामुळे चेन्नईयीन एफसीची स्पर्धेत घसरण झाली होती. आज विजय मिळविल्यामुळे त्यांना प्रगती साधला आली. त्यांनी १३ गुणांसह सातव्या क्रमांकावरून पाचव्या स्थानी उडी घेतली आहे. ‘अवे’ मैदानावर लागोपाठ दोन सामने जिंकलेल्या पुणे सिटीला आज अपयश प्राप्त झाले. त्यांचा हा स्पर्धेतील चौथा पराभव ठरला.

चेन्नई - गतविजेत्या चेन्नईयीन एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पाच लढतींनंतर पहिला विजय मिळविला. त्यांनी एफसी पुणे सिटीला दोन गोलांनी नमविले. जेजे लालपेखलुआ याने ४४व्या; तर ५१व्या मिनिटाला डेव्हिड सुसी याने गोल नोंदविला. मागील पाच लढतींत तीन बरोबरी आणि दोन सलग पराभव यामुळे चेन्नईयीन एफसीची स्पर्धेत घसरण झाली होती. आज विजय मिळविल्यामुळे त्यांना प्रगती साधला आली. त्यांनी १३ गुणांसह सातव्या क्रमांकावरून पाचव्या स्थानी उडी घेतली आहे. ‘अवे’ मैदानावर लागोपाठ दोन सामने जिंकलेल्या पुणे सिटीला आज अपयश प्राप्त झाले. त्यांचा हा स्पर्धेतील चौथा पराभव ठरला. त्यामुळे त्यांचे गुणतक्‍त्यातील स्थानही घसरले. १२ गुणांसह हा संघ सहाव्या स्थानी आला आहे.

Web Title: chennai beaten Pune City